श्रीराम विद्यालय रायपुर विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

0


श्रीराम विद्यालय रायपुर विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
काजीसांगवीः उत्तम आवारे २ ऑक्टोबर : श्रीराम विद्यालय रायपुर येथे आज दिनांक -२/१०/२०२३ वार सोमवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर.के. सर होते. तसेच प्रमुख पाहुणे विद्यालयातील उपशिक्षक श्री. पाटील एस.जी. सर होते. अध्यक्ष व प्रमुखांना पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यानी भाषणे केली . शिक्षक मनोगतामध्ये श्री. मोरे सर यांनी महात्मा गांधी यांची माहिती दिली व श्रीम. थोरात मॅडम यांनी जय जवान जय किसान घोषणेचे प्रणेते लालबहादूर शास्त्री यांचा जिवन परिचय करून दिला. शेवटी अध्यक्षीय भाषणात सरांनी महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गांगुर्डे आर.के. सर सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता ९ वी ब च्या सारीका आहेर व श्रावणी आहेर यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »