दिघवद भूमिपुत्रांचा नाशिक मध्ये सत्कार
दिघवदः (कैलास सोनवणे) चांदवड तालुक्यातील दिघवद गावचे भूमिपुत्र यांचा दिघवद वासी नाशिक निवासी यांच्यातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. गेल्या वर्षभरात दिघवद मधील अनेक तरुणांनी विविध क्षेत्रात गरुड भरारी घेतली. त्यांच्या यशाला कौतुकाची थाप देण्यासाठी नाशिकमध्ये वास्तव्यात असणाऱ्या दिघवदवासीयांनी या सत्काराचे आयोजन केले होते. यामध्ये सध्याच भालचंद्र रसाळ यांची सदस्य जिल्हा आयोग म्हणून निवड झाली, प्रा. योगेश गांगुर्डे यांना उत्तर महाराष्ट्राचा गिरणा गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला, किरण गांगुर्डे यांची सहाय्यक उपनिरीक्षक पदी निवड झाली, संदीप बारगळ व वैभव गांगुर्डे यांनी सनदी लेखापाल ही परीक्षा उत्तीर्ण केली, वृषाली गांगुर्डे ही मंत्रालय क्लर्क म्हणून स्पर्धा परीक्षेत मार्फत निवड, भारती गांगुर्डे यांची मंडळ अधिकारी म्हणून प्रमोशन झाले. या सत्कार प्रसंगी सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये गांधीजींचा जो संदेश होता गावाकडे चला असाच भाव काही सर्वांच्या बोलण्यामधून येत होता व आपल्या गावाची आपली नाळ ही जोडलेली असावी असेही सर्वांनी मत व्यक्त केले.
भालचंद्र रसाळ यांनी जरी कामाची व्यस्तता असली तरी देखील आभासी यंत्रणेच्या माध्यमातून निघून अशी मध्ये असणाऱ्या तरुणांना शिक्षण व नवे उद्देश्य साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यास आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वासन दिले. सनदी लेखापाल संदीप बारगळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना या सर्व यशामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद यावरून शिक्षण मिळाले त्या संस्कारांची शिदोरी आजही बरोबर आहे. आणि आम्ही कुठे असलो तरी आमचे पाय जमिनीवरच राहतील व गावाकडे नेहमीच ओढ राहील हे त्यांनी व्यक्त केले. भारती गांगुर्डे यांनी आपले मत व्यक्त करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली या धकाधकीच्या जीवनात नोकरी मिळवणे ही फार अवघड गोष्ट नाही परंतु ही नोकरी टिकून त्यामध्ये यश संपादन करणे तसेच कसोटीने काम करणे ही खरी आव्हाने आहे. वैभव गांगुर्डे यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना आम्ही आत्ता आत्ता नाशिकमध्ये आलो परंतु यापूर्वी नाशिक मध्ये येणे किती कठीण होते त्याही परिस्थितीमध्ये आपण सर्व नाशिककर या ठिकाणी आलात व स्थिर झालात ही आमच्यासाठी खरोखर प्रेरणा देणारी गोष्ट होती. किरण गांगुर्डे आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले आपल्या मुलांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे व ते योग्य करतील यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहिली पाहिजे. प्राध्यापक योगेश गांगुर्डे हे सत्काराला उत्तर देत असताना म्हणाले हा तर आपल्या कुटुंबातील सत्कार आहे व कुटुंबाने दिलेली फुल ही देखील अनेक सत्कारांपेक्षा मोठे असते. चुका ह्या मुलांकडून होतातच परंतु त्या मुलांनीही मोठ्या मनाने मान्य केल्या पाहिजे त्याचबरोबर त्या पालकांनी देखील आपल्या पदरात घेतल्या पाहिजे जेणेकरून मुलांना नवीन ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळतात. त्याबरोबरच हा सत्कार समारंभ विशेष म्हणजे हुतात्मा स्मारक नाशिक येथे आयोजित करून आपण सर्व शासकीय सेवेमध्ये काम करत असताना एक गोष्ट आठवणीत असावी की या देशाला स्वातंत्र्यासाठी अनेक थोरवीरांनी बलिदान दिलेले आहे त्याचे प्रतीक म्हणून हे हुतात्मा स्मारक व या ठिकाणी हा आयोजित सत्कार समारंभ.
नाशिक बरोबरच या सत्कारासाठी दिघवद मधून देखील अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. गावकऱ्या ंच्या वतीने विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नारायण गांगुर्डे त्याचबरोबर आनंदा गागुंडै आर व्हि पाटीलसर सोमनाथ गागुंडैसर राजाराम मापारी दीपक गांगुर्डे ग्रामसेवक दौलतगांगुर्डे साहेब अभियंता मापारी सर इत्यादींनी तुम्हा सर्वांना गावाबद्दल असणारी आत्मीयता व प्रेम यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत तसेच पुढील काळात आपण दिघवदसाठी अजून विकासाच्या संदर्भात योजना करू असे देखील ते बोलले. कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख म्हणून ॲड. सलीम शेख यांनी केले त्याबरोबरच खंडू गांगुर्डे व इतर सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष यात सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भाऊराव गांगुर्डे यांनी केले तसेच आभार श्री खंडू गांगुर्डे यांनी मानले. सर्व मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.