चांदवड येथील एसएनजेबी संचालित जैन महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

0

काजी सांगवी (वार्ताहर भरत मेचकुल) श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम (एसएनजेबी) (जैन गुरुकुल) नेमिनगर, राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी, कै. सौ. कांताबाई भवरलाल जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कला, श्रीमान मोतीलालजी लोढा वाणिज्य आणि श्रीमान पि. एच. जैन विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रीचे अवचित्य साधून जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी एसएनजेबी संस्थेच्या महाविद्यालयांचे प्राचार्य. डॉ.सी.डी.उपासनी, डॉ.आर.जी. ताथेड, डॉ.दत्ता शिंपी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. रक्तदान शिबिरात ६० दात्यानी यशस्वीरीत्या रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रा.स.यो. कार्यक्रमप्रमुख प्रा. भावेश अमृते, प्रा.दिपेश अग्रवाल, प्रा.सोहनी, प्रा.आवारे यांनी मेहनत घेतली. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष श्री.दिनेशकुमारजी लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा व उपाध्यक्ष श्री.अरविंदकुमारजी भंन्साळी. महाविदयालयाचे समन्वयक व प्रबंध समितीचे सहमानद सचिव श्री.झुंबरलालजी भंडारी, समन्वयक ॲड.प्रकाशचंदजी बोकडिया व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. पी.पी.गाळणकर तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळ व प्रबंध समितीच्या इतर सर्व सदस्यांनी सदर उपक्रमाबद्दल संस्थेच्या महाविदयालयीन आयोजनकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »