चायनीजमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो म्हणजे काय? त्याचा शरीरावर कसा होतो परिणाम…

0

चायनीजमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो काय आहे ?

अजिनोमोटो हा खरेतर एक फ्लेवर एन्हान्सर आहे . तो एक अन्न मिसळक ( Food additive ) आहे . अन्न पदार्थाला विशिष्ट असा स्वाद आणि एक आंबूस चव ; ज्याला शास्त्रीयदृष्ट्या उमामि ( Umami) चव म्हणून ओळखले जाते अशी चव सुद्धा हा अजिनोमोटो पदार्थाला देतो.अजिनोमोटो हे त्या उत्पादनाचे ट्रेड नेम आहे .त्याचे रासायनिक नाव आहे मोनोसोडियम ग्लुटामेट ( Monosodium glutamate (MSG) ) E621.

१९०८ साली टोकियो विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या किकूने आयकेडा यांच्या लक्षात आले की एमएसजी ग्लुटामिक ॲसिडपासून बनलेला सर्वात स्थिर असा क्षार आहे, आणि त्यातून सर्वोत्तम अशी ‘उमागी’ (पूर्व आशियायी भागात प्रसिद्ध असलेली) चव मिळते.’उमागी’ चा ढोबळ अर्थ होतो चविष्ट. पण ही चव सहसा मांस शिजवल्यानंतर यावी अशी अपेक्षा असते. प्रा आयकेडा यांनी असाही शोध लावला की ही चव नेहमीच्या गोड, आंबट, खारट, कडू या चवींपेक्षा वेगळी असते.या एमएसजीमधला जादू घडवणारा घटक पदार्थ म्हणजे ग्लुटामेट. ग्लुटामेट हे सामान्य अमिनो अँसिड जे अनेक नैसर्गिक पदार्थांमध्ये आढळते, जसं की टमाटे, पार्मिसान चीझ, सुकवलेले मशरूम, सोया सॉस, अनेक भाज्या, फळे आणि आईचे दूध.

आयकेडा यांनी हे अँसिड त्यांच्या बायकोच्या स्वयंपाकघरातल्या एका सागरी वनस्पतीतून वेगळं केलं. ही सागरी वनस्पती म्हणजे कोंबू. जपानी स्वयंपाकात तिचा मुक्तहस्ताने वापर केला जातो.

आता या अमिनो ॲसिडमध्ये सोडियम घातलं की (सोडियम हा आपल्या रोजच्या जेवणात आपण जे मीठ वापरतो त्यातला एक घटक) या ग्लुटामेटची पावडर बनते. ते स्थिर स्वरूपात उपलब्ध होते. या मिश्रणातून आपल्याला मिळते मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच एमएसजी म्हणजेच अजिनोमोटो.

आयकेडा यांचा एमएसजी बनवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यातून त्यांनी अजिनोमोटा या उत्पादनाची निर्मिती केली. अजिनोमोटोचा अर्थ होतो ‘चवीचा आत्मा’.

आता हे अजिनोमोटो जगभरातल्या स्वयंपाकात वापरले जाते.

अजिनोमोटो अर्थात MSG चा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम:

चायनीज फूड जसं की, नूडल्स, सूप आदीमध्ये याचा वापर केला जातो.बर्गर, पिज्जा, मॅगी मसाला यांच्यातही याचा वापर टेस्ट वाढवण्याच्या हेतूनं केला जातो.काही वर्षांपूर्वी त्याला ‘चायनिज रेस्टाँरन्ट सिंड्रोम’ म्हणायचे. म्हणजे अचानक काही लक्षणं दिसायची – डोकेदुखी, मळमळ, शरीराच्या काही भागाला मुंग्या येणे… चायनिज जेवण केल्यानंतर लोकांना हा त्रास व्हायचा.कोणत्याही पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हा त्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो.

आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीवर अजिनोमोटो च्या अतिसेवनाचा परिणाम होतो. शरीरात अतिप्रमाणात अजिनोमोटो हे फूड अ‍ॅडक्टीव्ह गेल्यास पॅनिक अटॅक येणं, गरगरणे अशा समस्या वाढतात. लहान मुलांच्या आहारात अजिनोमोटो अधिक प्रमाणात जाणंदेखील त्रासदायक ठरू शकते.

अजिनोमोटोमुळे :
रक्तदाबात वाढ,स्थूलता,मध्यवर्ती चेतासंस्थेवर विपरीत परिणाम – अजिनोमोटो एक उत्तेजक म्हणूनही काम करतो.
जसं वरती म्हणलं तसं , एखादा पदार्थाचा डोस किती आहे यावर बर्याच गोष्टी ठरतात .साधारण सर्वच अन्न मिसळक ( Food additive ) तयार करताना , त्यांचे मार्केटिंग करताना त्यांचा उद्देशपूर्वक वापर करताना किती मर्यादा असायला हव्यात याचे बंधन घालून दिलेले असते. यासाठी काही नियामक संस्था अस्तित्वात असतात. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही .अजिनोमोटोच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये फॅट साचून राहण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे कालांतराने यकृताचे विकार जडण्याचे प्रमाण वाढते. दाह वाढू शकतो.

अजिनोमोटोचा परिणाम मेटॅबॉलिक रेटवर होतो
काही अभ्यासानुसार, अजिनोमोटोचा आहारात अति प्रमाणात समावेश झाल्यास मेटॅबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा त्रास वाढतो. अजिनोमोटोमुळे कार्डियोव्हसक्युलर म्हणजेच हृद्यविकार वाढतात, रक्तदाबाचा त्रास वाढतो तसेच मधूमेह बळावण्याची शक्यता वाढते.

अजिनोमोटोचे विपरीत परिणाम कधी दिसू शकतात ?

एखादा व्यक्ती जर रोजच अजिनोमोटोयुक्त पदार्थ खात असेल तर त्याला ते अतिरिक्त रसायने पचवण्यासाठी त्याच्या शरीराला निश्चितच जास्त कष्ट पडणार आहेत .हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्याचे अतिसेवन अनेक आजारांना निमंत्रण देणारे आहे.अशा प्रकारे अजिनोमोटोचे परिणाम दिसू शकतात तसेच अजिनोमोटोचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »