Goat Farming : शेळीपालन व्यवसाय – आरोग्य व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बाबी

0

Goat Rearing :

शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा व्यवसाय आहे.शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते.

आरोग्य व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बाबी :

-गोठा व्यवस्थापनात आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य बदल करावे.

-शेळ्यांना हंगामनिहाय हिरवा आणि सुक्या चारा द्यावा.
-करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण्यासाठी करडांचे आठवड्यातून एकदा तरी वजन करावे. वाढीच्या प्रमाणावर आहारात योग्य तो बदल करावा.


– शेळ्यांना दररोज दुपारी एक ते पाच या वेळेत चरण्यासाठी सोडावे.चारा खाण्यासाठी शेळ्या फिरत असल्याने त्या निरोगी राहण्यास मदत होते.


– प्रत्येक लहान पिलास १५ दिवस तीन वेळा दूध पाजावे.तसेच नवजात पिलांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घ्यावा.

-थेट विक्री तसेच नगावर जागेवरूनच विक्री करण्यावर अधिक भर द्यावा.

-गोठ्यामध्ये करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मरतुकीचे सत्र सुरू होते. अति थंड बाह्य हवामानास गोठ्यात उबदारपणा, उष्णतामान वाढविण्यासाठी विद्युत दिवे उपयोगी पडतात.

-पावसाळयातील उष्ण व दमट हवामानात जंत प्रादुभागवास उपयुक्त असते. त्यामुळे शेळया-मेंढयांमध्ये पावसाळयात जंत प्रादुर्भाव मोठया प्रमािावर होतो.तसेच प्रादुर्भाव झाल्यास लसीकरण करावे.

-थंड वातावरणात आर्द्रतेमुळे करडांचे कप्पे लवकर कोरडे होत नाहीत. लेंड्या, पातळ हगवण किंवा मूत्र यामुळे कप्प्यात ओल राहते, मात्र दिवसातून तीन-चार वेळा जागा बदलून करडे कोरड्याच ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »