Goat Farming Scheme:अहिल्या शेळी योजनेअंतर्गत मिळणार 90 टक्के अनुदानावर शेळ्या..

0

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करीत असतात. ज्यात कमी खर्चात बंपर कमाई मिळते. मात्र आता पशुपालकांसाठी सरकारने एक निर्णय घेतला आहे. शेळीपालनासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे.योजनेमध्ये महिलांसाठी 90% अनुदान हे मिळणार आहे म्हणजेच दहा शेळ्या व एक बोकड याप्रमाणे तुम्हाला शेळ्या मिळणार आहे. सर्वसाधारण 18 शेळ्यांपासून तुम्ही एका वर्षात 2,16,000 रुपये कमवू शकता. शेळीचे दूध  विकून तुम्ही चांगले पैसेही कमवू शकता.

योजनेअंतर्गत, महिलांना अनुदानावर शेळ्या दिल्या जाणार आहे. 18 ते 60 वर्षा दरम्यान महिलेचे वय असावे.योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अपत्य प्रमाणपत्र
कास्ट सर्टिफिकेट
स्वयंघोषणापत्र

ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती
सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी प्ले स्टोर वरून अहिल्या योजना हे ॲप डाऊनलोड करावे,विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे.
नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे, प्राथमिक निवड व अंतिम निवड करण्यात येईल. त्यानंतर एक अर्ज ओपन होईल अर्ज ओपन झाल्यावर संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून अर्ज सबमिट करावा

अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज अहिल्या योजना अर्ज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »