कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड
कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड, कमी पावसाने उत्पादन घटले
मराठवाडा विदर्भ या कोरडवाहू किंबहुना पावसावर अवलंबून असलेल्या पट्टातील मुख्य नगदी पीक म्हणजे कपाशी होय. पिके ऊन धरत असून परिपक्क न झालेल्या कपाशीच्या कैऱ्यातुन देखील कापूस डोकावत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही ठिकाणी बाजारात देखील कापूस विक्री करिता आला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पन्न घट असतांना सुद्धा समाधानकारक बाजारभाव कापसाला मिळत नसल्याने शेतकऱ्यांत निराशा निर्माण झालेली दिसून येत आहे.
उष्णतेमुळे आणि कमी पाण्याच्या कमतरतेमुळे आधीचं उत्पन्नात जवळपास अर्ध्याहुन अधिक घट झाली आहे. त्यात काही अंशी शेतकऱ्यांकडे अद्याप गेल्या वर्षीचा कापूस साठवलेला आहे. ज्यांना या वर्षी अपेक्षित दर मिळेल अशी अपेक्षा होती मात्र या वर्षीची सरासरी सहा हजार ते सात हजार अंदाज बघता ती अपेक्षा देखील भंग झाली आहे.
राज्यात आतापर्यंत खासगी बाजारात दीड लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु दर प्रतिक्विंटल ६,८०० रुपयांपर्यंत असल्याने शेतकरी दरवाढीचे प्रतीक्षेत आहेत..