कमी पाण्यात तयार होणारे गव्हाचे वाण 🌱

0

गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वाणांची व जातीची पेरणी केल्यास पिकांचे चांगले व अधिक उत्पादन मिळू शकते. पेरणी वेळेवर आणि चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडयात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत गव्हाची पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. १५ डिसेंबरनंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

कमी पाण्यात तयार होणारे गव्हाच्या सुधारित जाती :

नेत्रावती (एन आय ए डब्ल्यू: १४१५) : पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आय.ए.डब्ल्यू-१४१५ (नेत्रावती) या सरबती वाणाची लागवड करावी. पाऊस कमी असल्याने नेत्रावती या वाणाची पेरणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या जातीसाठी महाराष्ट्रातील हवामान विशेष पूरक आहे.हे वाण तांबेरा रोगास प्रतिकारक असून जिरायती क्षेत्रात १०५ ते १०८ व मर्यादित सिंचनाखाली १०८ ते १११ दिवसात कापणीस तयार होते.या जातीची पेरणी ही ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पंचवटी (एन.आय.डी.डब्ल्यू: १५) : या जातीला एन आय डी डब्ल्यू-१५ म्हणून ओळखले जात आहे. हा महाराष्ट्रात पेरणीसाठी शिफारशीत वाण आहे. हा वाण जिरायती भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक असून तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. पीक १०५ ते ११० दिवसांत कापणीस तयार होते.

शरद (एकेडी डब्ल्यू-२९९७-१६) : जिरायत पेरणीसाठी एकेडी डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत.हा देखील गव्हाचा एक प्रमुख वाण आहे. महाराष्ट्र राज्यासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. जिरायती भागासाठी हा वाण फायदेशीर ठरतो. जिरायती पेरणीसाठी उपयुक्त या जातीची ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी केली पाहिजे. हेक्टरी ७५ ते १०० किलो पर्यंतचे बियाणे वापरले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »