दिघवद शाळेत माजी विद्यार्थी यांचा मैत्री स्नेहसंमेलन सोहळा

0

दिघवद शाळेत माजी विद्यार्थी यांचा मैत्री स्नेहसंमेलन सोहळा

दिघवदः (कैलास सोनवणे) स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात सन 2001 -2002 या वर्षी इयत्ता 10 मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मैत्री या कार्यक्रमाचे आयोजन, विद्यालयाचे माजी व प्रथम मुख्याध्यापक श्री शेडगे सर तसेच माजी शिक्षक श्री वारके सर ,श्री खुटे सर,श्री एस एम देवरे सर, जाधव सर ,अहिरे सर, चित्ते सर, डी एल पवार सर, ए एस पवार सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गांगुर्डे सर सचिव श्री कारभारी गांगुर्डे इत्यादी पदाधिकारी तसेच विद्यमान मुख्याध्यापक श्री पेंढारी सर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. तब्बल 20 वर्षानंतर हे विद्यार्थी एकमेकांना कृष्ण सुदामा प्रमाणे भेटले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.विलास झाल्टे व adv. वैशाली पवार यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बबन गांगुर्डे यांनी केले आणि आभार संदीप पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी शंकर रसाळ ,प्रकाश गायकवाड, वैभव निंबाळकर, दीपक शिलावट, ज्ञानेश्वर गांगुर्डे ,निवृत्ती गांगुर्डे , रामदास हांडगे ,दीपक बिडवे ,शरद गांगुर्डे ,विक्रम गांगुर्डे ,रवींद्र डोंगरे ,बाळू डोंगरे, सुभाष मापारी, कृष्णा ठोके, समाधान नवले , बापू जाधव, गणेश गांगुर्डे , जुबेर कादरी, भाऊसाहेब गांगुर्डे, भूषण सूर्यवंशी ,विक्रम मापारी बापूसाहेब मापारी , प्रशांत मापारी ,समाधान शिंदे, विठ्ठल ठाकरे,मच्छिंद्र ठाकरे,अनिल गांगुर्डे साहेबराव वाघ, शितल शिंदे ,रत्ना शिंदे, रेखा नवले, अर्चना गांगुर्डे,आदी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घेतला.सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अथक परीसश्रम घेतले.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »