दहीवदला ग्रामस्थांनी केला वृक्षांचा वर्धापन दिन साजरा
दहीवदला ग्रामस्थांनी केला वृक्षांचा वर्धापन दिन साजरा
काजीसांगवी:-(उत्तम आवारे) चांदवड तालुक्यातील दहीवद येथिल ग्रामपंचायतच्या वतीने मागील वर्षी गावात पर्यावरण समतोल राखण्यासाठी घर तिथे झाड या उपक्रमांतर्गत गावातील मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली होती. या वृक्षांना तब्बल एक वर्ष झाल्याने गावातील ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखाने या वृक्षांचा वाढदिवस साजरा केला.
येथील प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामपंचायतची एक हाती सत्ता घेऊन सरपंच दिपाली निंबाळकर व उपसरपंच छाया वाघमोडे व सर्व सदस्य मंडळानी गाव विकासाचा पाऊल उचले .गावात अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात असुन लोकसहभागातून मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर गावामध्ये व स्मशानभुमि परिसरात आयुर्वेदिक व देशी वृक्षांची लागवड केली. तसेच सरंक्षणसाठी जाळ्याचा वापर करण्यात आला. वृक्षांच्या संगोपनासाठी येथिल एक समिती स्थापन केली. त्यासाठी लागणारे पाणी हे ठिंबक सिंचन द्वारे देऊन मशागतीसाठी कर्मचारी नेमण्यात आले तब्बल एक वर्षांनी हे झाडे गावात मोठ्या डोलाने दिसु लागल्याने ग्रामस्थानी या वृक्षांचा वाढदिवस मोठ्या थाटाने साजरा केला गावातील महिलांनी प्रत्येक वृक्षाचे औंक्षावं करुन सेंद्रीय खत पाणी दिऊन वाढदिवस साजरा केला.तसेच गावातील व कामानिमित्त बाहेरगावी असलेले तरुणानी लोकसहभागातुन नविन पाण्याच्या ट्रँकर घेण्यासाठी मोठा सहभाग नोदवला तसेच गावातील प्रत्येक नागरीकानी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य रत्ना खांदे, वत्सलाबाई केदारे ,गणेश निंबाळकर, संतोष केदारे ,जनार्दन गांगुर्डे ग्रामसेवक हिरामण जाधव कर्मचारी सुनील सोनवणे संदीप वाघमोडेआदीसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते