काजीसांगवी विद्यालयात संविधान दिन उत्साहात संपन्न

0


काजीसांगवीः(उत्तम आवारे)
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, कै नरहर पंत कारभारी ठाकरे जनता माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर होते. व्यासपीठावर सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील, जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर उपस्थित होते .
सुरवातीला गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान दिनाच्या घोषणा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापपुजनाने करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांच्या जागरूकतेसाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन संगीत शिक्षक बापू ठाकरे यांनी केले. .
याप्रसंगी शिक्षक मनोगतातून माणिक कुंभार्डे यांनी भारतीय संविधान ,त्याची निर्मिती त्यासाठी केलेला मसुदा व भारतीय संविधानाचे लिखित स्वरूप याविषयी माहिती दिली.


त्यानंतर अध्यक्षीय मनोगतातून बोलताना प्राचार्य न्याहारकर सर यांनी सांगितले की, भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाधान कोल्हे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »