जिल्हाधिकारी सह आमदार डॉ राहुल आहेर यांचा तालुक्यातील पूर्व भागात नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन नुकसानीची पाहणी

0

जिल्हाधिकारी सह आमदार डॉ राहुल आहेर यांचा तालुक्यातील पूर्व भागात नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन नुकसानीची पाहणी



भरत मेचकुल काजी सांगवी ( वार्ताहर) काल चांदवड तालुक्यात गारांसह पाऊस झाला यात पूर्व भागातील वाकी बुद्रुक वाकी खुद्र काळखोडे वाहेगाव तळेगाव वडगाव पंगु कातरवाडी काझी सांगवी रेडगाव साळसाने सोनी सांगवी तसेच परिसरातील काही गावांमध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वाकी तळेगाव या ठिकाणी द्राक्ष बागा पूर्णता उध्वस्त झाले तसेच कांदा पिके पूर्णपणे नष्ट झाले याची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी श्री जलाल शर्मा यांच्यासह आमदार डॉक्टर राहुल आहेर प्रांत चंद्रशेखर देशमुख तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब गटविकास अधिकारी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे डॉक्टर नितीन गांगुर्डे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर तालुका अध्यक्ष विलास भवर प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या शेतकऱ्यांचे नुकसान हे भरून निघण्यासारखे नाही परंतु लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम याप्रसंगी करण्यात आले

पाहणी करतेवेळी जिल्हाधिकारी श्री शर्मा साहेब यांनी तात्काळ तहसीलदार तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावी व सदर माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठवावी असे आदेश करण्यात आले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगण्यात आले की शेतकऱ्यांच्या सर्व भावना या शासनामार्फत आम्ही वरिष्ठांकडे पाठवू व शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करू

यावेळी डॉक्टर आहेर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कसे जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करेल व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देईल असे आश्वासन दिले तसेच 2021 साली तालुक्यात अतिवृष्टी झाली होती परंतु आघाडीच्या सरकारच्या काळात चांदवड तालुक्याला वगळण्यात आले होते प्रसंगी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊन शेतकरी या अनुदानापासून वंचित होते ते अनुदान शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे यावेळेस डॉक्टर यांनी सांगितले

या पाहणी दौऱ्यामध्ये तळेगावचे सरपंच श्री जिरे सर यांनी जिल्हाधिकारी तसेच डॉक्टर राहुल आहेर यांच्याकडे यावर्षी तालुक्यात दुष्काळ तसेच या अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले शेतकऱ्यांकडे पीक कर्ज भरण्यासाठी तसेच लाईट बिल तसेच इतर कुठलीही कर भरण्यासाठी पैसे नाही एक रुपयाही उत्पन्न होणार नसल्याने शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावे अशी विनंती केली

तळेगाव येथे नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी आमदार डॉ राहुल आहेर डॉ कुंभार्डे तहसीलदार मंदार कुलकर्णी डॉक्टर गांगुर्डे तालुका कृषी अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »