काजीसांगवी विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
काजीसांगवी विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
काजीसांगवीः(उत्तम आवारे) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कै नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर होते.समवेत व्यासपीठावर सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर ,पर्यवेक्षक सुभाष पाटील ,आरोग्य विभाग समन्वयक प्रविण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आठवी अ च्या वर्गांने सदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले .प्रसंगी कोमल ढोमसे कृष्णा गावडे या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षक मनोगतातून देवरे मॅडम व कोल्हे सर यांनी सांगितले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाज सुधारक होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते.त्यांनी जातीभेद व अन्यायाविरुद्ध लढा दिला.मानवी हक्कांचे कैवारी,जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदे पंडित,राजनीतिज्ञ,लेखक,समाज सुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक,दिन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे महायोद्धा,उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारे महामानव.आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे थोर व्यक्ति होते.
अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक न्याहारकर सर म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.महान व्यक्तिमत्वातून स्वतःचा विकास करणे हे प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया गावडे व आभार प्रणाली काळे हिने मानले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.