डासांपासून सुटका! जर्मन कंपनीचे उपकरण; फोनला कनेक्ट करून ‘असा’ करा वापर….

0

यूएसबी या साधनांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. इतर डिव्हाइजना कनेक्ट करून चार्ज करणे, डेटा किंवा फाईल ट्रान्सफर करणे आदी बऱ्याच गोष्टींसाठी याचा उपयोग करण्यात येतो. पण, तुम्ही कधी असे ऐकलेय का ? की, एका यूएसबी-सी-डोंगलमधील उष्णतेने तुमचा डास, माशी या कीटकांपासून बचाव केला आहे. नाही; तर अलीकडेच एक नवीन यूएसबी-सी डोंगल बाजारात आणले गेले आहे; त्यातील उष्णतेद्वारे तुमचा डास चावण्यापासून बचाव होऊ शकतो.

कामेडी (Kamedi) या जर्मन कंपनीने ‘हीट-इट’ यूएसबी टाईप-सी डोंगलचे अनावरण केले आहे आणि असा दावा केला आहे की, ते डोंगल डास, माशी यांपासून तुमचा बचाव करू शकते. हे छोटे गॅझेट तुमच्या फोनच्या Type-C पोर्टमध्ये सहज बसू शकते. त्यात धातूचा पृष्ठभाग आहे; जो उष्णता निर्माण करतो. हे गॅझेट वापरण्यासही खूप सोपे आहे. तुम्हाला ते तुमच्या फोनमध्ये कनेक्ट करावे लागेल आणि iOS किंवा Android ॲप वापरावे लागेल.

या ॲपद्वारे तुम्ही हीट ट्रीटमेंट कस्टमाइज करू शकता. जर तुम्हाला त्याबाबत तुमच्या मुलांबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्हाला या समस्येचे निराकरण ॲपमध्येदेखील मिळेल. हे ॲप मुलांसाठी अनुकूल किंवा संवेदनशील स्किन मोडसह येते; जे त्वचेनुसार तापमान सेट करते. उष्णतेमुळे डास किंवा इतर कीटक जर तुम्हाला चावले असतील, तर तो भाग लवकर बरा होण्यास मदत होते. कामेडी एका अभ्यासाच्या आधारे आपल्या उत्पादनाच्या या क्षमतेचा दावा करीत आहे.

हे जगातील पहिले कंट्रोल्ड कन्सट्रेटेड ‘हीट इफेक्ट’ संशोधन आहे; जे कीटक चावल्यानंतर उदभवणाऱ्या खाजेपासून आराम देते. या संशोधनात सुमारे १२ हजार लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. संशोधनात असे आढळून आले आहे की, हे उपकरण वापरल्यानंतर लोकांना डास किंवा इतर कीटक चावल्यामुळे कमी खाज सुटते. आयफोन आणि ॲण्ड्रॉइड दोन्ही युजर्स हे उपकरण वापरू शकतात. येथे ॲण्ड्रॉइड आधीच टाइप-सी पोर्टसह आला आहे. टाईप-सी पोर्ट आता आयफोनमध्येही जोडण्यात आला आहे. तसेच हे हीट-इट डोंगल अमेरिकन आणि युरोपियन मार्केटमध्ये ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »