सॅमसंग कंपनीन केले Galaxy A25,A15 हे दोन 5G स्मार्टफोन लॉन्च, ग्राहकांना मिळणार ३ हजारांपर्यंतचा कॅशबॅक!

0

सॅमसंग कंपनीने A सिरीज मधील A25 आणि A15 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहे.तसेच SBI कार्डवर ग्राहकांना यावर ३ हजारांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.

सॅमसंग कंपनीने Galaxy A25 आणि Galaxy A15 5G हे स्मार्टफोन लॉन्च केले आसून हे दोन्ही स्मार्टफोन्स Galaxy A23 5G आणि Galaxy A14 5G चे सक्सेसर आहेत. नवीन डिवाइस Super AMOLED डिस्प्लेसह उपलब्ध आहे. या दोन्ही स्मार्टफोन्ससाठी ब्लॅक, ब्लू आणि यलो कलरचा लूक लाँच केला आहे. Samsung Galaxy A17 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये एवढी आहे. तर, Galaxy A25 5G ची किंमत २६,९९९ रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोन्सवर सध्या ३००० रुपयांची अडिशनल कॅशबॅक ऑफर असून SBI कार्डवर ग्राहकांना हा लाभ मिळत आहे.Galaxy A15 5G आणि Galaxy A25 5G मध्ये 50MP कॅमेऱ्यासह उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहे.

सॅमसंगच्या नवीन Galaxy A सीरीज स्मार्टफोन्समध्ये 6.5 इंचाची AMOLED स्क्रीन आहे. Galaxy A25 5G मध्ये Exynos 1280 SoC प्रोसेसर आहे, तर Galaxy A15 5G मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.दोन्ही हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेलच्या प्राथमिक कॅमेर्‍यांसह ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट्स आहेत. सेल्फी कॅमेरा सामावून घेण्यासाठी दोन्ही मॉडेल्समध्ये वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉच आहे. Galaxy A25 5G आणि Galaxy A15 5G च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 8GB पर्यंत RAM, साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर, 25W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh शक्तिशाली बॅटरी समाविष्ट आहे.Samsung Galaxy A15 5G आणि A25 5G नॅनो ड्युअल सिमसह येतात आणि Android 13 आधारित One UI 5 वर काम करतात. सॅमसंगने नवीन हँडसेटवर पाच वर्षे सुरक्षा अद्यतने आणि चार वर्षांच्या ओएस अपग्रेडचे वचन दिले आहे.

Galaxy A25 5G मध्ये 6.5 इंच फुल HD + (1,080×2,408 pixels) सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश दर आणि 1,000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. A15 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स च्या पीक ब्राइटनेससह समान आकाराचा डिस्प्ले आहे. Galaxy A25 5G मध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे, तर A15 5G मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »