कोट्यवधींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली माजी क्रिकेटपटू मृणांक सिंगला अटक, हॉटेल ताज महल पॅलेससह ऋषभ पंतलाही फसवले..

0

कोट्यवधींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली माजी क्रिकेटपटू मृणांक सिंगला अटक करण्यात आली आहे.कर्नाटकातील एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत मृणांक सिंह हा आलिशान हॉटेल्समध्ये राहत असत. २०२२ मध्ये २२ जुलै ते २९ जुलै यादरम्यान तो ताज पॅलेस हॉटेलमध्ये राहत होता. मात्र हॉटेलचे ५ लाख ५३ हजार ३६२ रुपयांचे बिल न देताच सिंह याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर हॉटेलकडून त्याला संपर्क करत अनेकदा पैसे भरण्याबाबत विनंती करण्यात आली.जुलै २०२२ मध्ये मृणांक सिंह याने ताज पॅलेस हॉटेलची ५ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केली होती. मी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असल्याचा दावा तेव्हा मृणांक सिंह याने केला होता. मृणांक सिंह याच्याकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचाही समावेश आहे.

पंत याची तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. अखेर २२ ऑगस्ट रोजी ताज पॅलेस हॉटेलकडून नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, मृणांकला लक्झरी लाइफस्टाइलची खूप आवड होती. ५ -स्टार हॉटेल्समध्ये राहणे, मॉडेल्ससोबत पार्टी करणे, त्यांच्यासोबत फोटो काढणे आणि माझ्या ‘गर्ल फ्रेंड्स’सोबत परदेशात फिरणे. असे त्याचे छंद होते. मृणांकने ऋषभ पंतकडून १.६ कोटी रुपयांची फसवणूक केली होती.मात्र आता मृणांक सिंहला नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मृणांकने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्याचे तपासात समोर आले आहे. पुढे राजस्थानमधील कॉलेजमधून एमबीए केले. तो दावा करतो की तो हरियाणाच्या अंडर-१९ संघाकडून खेळला आहे, २०१४ ते २०१८ या कालावधीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे आणि २०२१ मध्ये हरियाणा संघासोबत रणजी खेळला आहे. हे त्याचे दावे आहेत आणि पोलीस त्याच्या सर्व दाव्यांची पडताळणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »