दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार देणार अनुदान,जाणून घ्या काय आहे योजना?

0

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपयांच्या सबसिडीसोबत ३२ रुपयांचा दर मिळणार आहे.राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.४ ) रोजी नागपूर येथे बैठक झाली होती. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अनुदान योजना राज्यातील सहकारी दूध संघामार्फत राबविण्यात येणार आहे. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट / ८.३ एसएनएफ या प्रती करिता किमान २९ रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करायचा आहे. यानंतरच शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे.

नागपूर अधिवेशनात मंत्री विखे पाटलांनी घोषणा केली होती.राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या अधिवेशनात केली होती. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. मात्र, घोषणेनंतर याबाबतचा कोणताही आदेश अद्याप निघाला नव्हता. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोव्हेंबर २०२३ मधील आकडेवारीनुसार, ४३.६९ लाख लिटर दूध सहकारी दूध संघामार्फत संकलित करण्यात येते.५ रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 2 महिन्यासाठी १३५ कोटी ४४ लाख इतके अनुदान आवश्यक असेल. तसेच या योजनेचा कालावधी हा १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. दरम्यान, डीबीटी करण्यासाठी बँक खाते हे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असणार आहे. तसेच पडताळणी करणे आवश्यक राहील.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »