हरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रण
घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी साधारणतः ३०-४० घाट्यांचे नुकसान करते. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न करावेत.
*एकात्मिक व्यवस्थापन :-
रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळावा. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिकरीत्या कार्यरत मित्रकीटक उदा. क्रायसोपा, लेडी बर्ड बीटल व रेड्यूव्हीड ढेकूण नाहक मारले जातात. परिणामी घाटेअळीच्या नैसर्गिक नियंत्रणात बाधा आल्याने घाटेअळीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. अशा मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
विविध पक्षी उदा. बगळे, मैना, राघू, निळकंठ, काळी चिमणी इ. अळ्या वेचतात. शेतामध्ये प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे उभारावेत.
https://www.facebook.com/groups/624030844652704
पिकाचे सातत्याने निरीक्षण करून, किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के सर्वप्रथम वनस्पतिजन्य किंवा कीटकनाशकांना प्राधान्य द्यावे.
त्यासाठी फवारणी प्रति १० लिटर पाणी
*फुलोऱ्यावर आल्यानंतर -* निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५० मिलि
*अळ्या दिसू लागताच जैविक नियंत्रणासाठी -* एचएनपीव्ही हेक्टरी ५०० एलई + ५० ग्रॅम राणीपाल किंवा वातावरणात सापेक्ष आर्द्रता पुरेशी असल्यास बिव्हेरिया बॅसीयाना ६० ग्रॅम.
*रासायनिक नियंत्रण
वरील वनस्पतिजन्य किंवा जैविक फवारणीनंतरही घाटेअळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास, किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यानंतर शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. अन्यथा फवारणी टाळावी.
*आर्थिक नुकसान संकेत पातळी :*सरासरी १ अळी प्रतिमीटर ओळीत किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान.
*फवारणी प्रति १० लिटर पाणी*
क्विनॉलफॉस (२० टक्के प्रवाही) २० मिलि.
इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के) ३ ग्रॅम.
डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १० मिलि.
क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) २.५ मिलि.
टीप : वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून, आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
*संपर्क : ०७२४-२२५८०५०*
(कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
📚 *स्तोत्र :ॲग्रोवन*
डॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. डी. बी. उंदिरवाडे.
🎋🎋🎋