सामूहिक तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करा..

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर २०२२ पासून राज्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून,बुलढाणा जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत ६३ शेततळे पूर्ण झाले आहे. सध्याच्या मोठ्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके तसेच फळबागाच्या संरक्षित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.या योजनेत सहभागी होण्याकरिता अर्जदार शेतकऱ्यांकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती पाहता शेततळे योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयापर्यंत व अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी १ लाख ५० हजार रुपयापर्यंत अनुदान मिळते.काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येते. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएसी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाइन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे अनुदान मिळणार आहे. दोन हेक्टर ते पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्र असल्यास ३ लाख ३९ हजार रुपये अनुदान तसेच एक ते दोन हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असल्यास १ लाख ७५ हजारांएवढे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते,की सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

वैयक्तिक शेततळे योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही.तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
महाडिबिटी वर करा अर्ज
यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडिबिटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा.