शेतकरीपुञ प्रा. संदीप वाघ यांना ‘ पीएच.डी ‘ पदवी प्रदान

0

पन्हाळे ता. चांदवड येथील शेतकरीपुञ प्रा. संदीप वाघ यांना ‘ पीएच.डी ‘ पदवी प्रदान

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम ( जैन गुरुकुल ) संचलित, श्रीमान सुरेशदादा जैन औषधनिर्माणशास्ञ महाविदयालयातील औषधनिर्माण रसायनशास्ञ विषयाचे प्राध्यापक श्री. संदीप वाघ यांना नुकतीच साविञीबाई फुले पुणे विदयापीठ यांच्याकडून पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. संदीप वाघ यांनी ” Design, Synthesis and Screening of Anti-Proliferative Potential of Some Selective Estrogen Receptor Modulator
( Breast Cancer) ” या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांना यासाठी महाविदयालयातील औषधनिर्माण रसायनशास्ञ विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.ए. चट्टपल्लीवार , महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सी.डी.उपासनी, डॉ. मिलिंद वाघ, डॉ.संजय वाघ, डॉ.उर्मिला जोशी या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष श्री.दिनेशकुमारजी लोढा,सचिव श्री.जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा व उपाध्यक्ष श्री.अरविंदकुमारजी भंन्साळी. महाविदयालयाचे समन्वयक व प्रबंध समितीचे सहमानद सचिव श्री.झुंबरलालजी भंडारी, समन्वयक ॲड.प्रकाशचंदजी बोकडिया, प्रशासकीय अधिकारी श्री.पी.पी.गाळणकर,संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ व प्रबंध समिती सदस्य यांनी प्रा. संदीप वाघ यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »