ज्ञानदीप परिवारातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे यशस्वी आयोजन
ज्ञानदीप परिवारातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे यशस्वी आयोजन…
काजीसांगवीः (उत्तम आवारे) आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा आणि त्यांचे स्वरूप बालवयातच विद्यार्थ्यांना समजावे आणि भविष्यात त्यांना यशस्वी करियरचा पर्याय निवडण्यासाठी मदत मिळावी या उद्देशाने तळेगांव रोही येथील ज्ञानदीप परिवार या शैक्षणिक ग्रुपने संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही येथे 27 जानेवारी 2024 रोजी सामान्य ज्ञान परीक्षा आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करून नावीन्यपूर्ण शिवजन्मोत्सवाचे नियोजन केले होते.हे आयोजनाची यशस्वी पाचवे वर्ष होते.यामध्ये विद्यालयाचे 340 विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धा दोन गटात घेतल्या गेल्या.दोन्ही गटात प्रथम पाच यशस्वी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी मोठ्या उत्साहात पार पडले.स्पर्धेचे निकाल..लहान गट:समीक्षा बाळू मोरे प्रथम,ईश्वरी अनिल पाटील द्वितीय,कीर्ती योगेश मोरे तृतीय,सृष्टी संतोष पाटील चतुर्थ,सायली मच्छिंद्र गांगुर्डे पाचवी..
मोठा गट:प्रेरणा संतोष रोकडे प्रथम,आदेश आत्माराम भोकनळ द्वितीय,दीप्ती प्रकाश केदारे तृतीय,समीक्षा अशोक गवंडे चतुर्थ,आरती सुभाष वाकचौरे पाचवा क्रमांक मिळाला..यावेळी ज्ञानदीप परिवारातील सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करून त्यांचे अभिनंदन केले…