दिघवद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0

दिघवद येथे शिवजयंती उत्साहात साजरी. ‌.

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे): येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली ‌‌यावेळी जिल्हा परिषद शाळा व स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आणि गावातील तरुण एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम राष्ट्रगीत व गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनीं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडे गिते अभंग पाळणा नाटिका सादर करण्यात आले दिघवद येथील ग्रामस्थांनी डिजे कर्कश आवाजाला फाटा देऊन गावातील तरुण व लहान मुलांना शिवाजी महाराजांच्या विचारांचा पायंडा देण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सांगितले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याचे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत या कार्यक्रमाला गावातील आजी माजी सोसायटीचे चेअरमन व संचालक तशेंच ग्रामपंचायत सदस्य व जि,प शाळेचे शिक्षक व स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक व गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »