तांदूळ शिजवताना ३ गोष्टी लक्षात ठेवा वजन वाढणार नाही..

0

जर तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असाल तर लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतील. याच कारणामुळे भात कितीही आवडत असेल तरीही लोक भात खाणं टाळतात. भारतात दक्षिणेला सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो. साऊथ इंडियाचे फेमस पदार्थ जसं की इडली, डोसा, अप्पम, खीर, अप्पे या सगळ्यात पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य घटक आहे.  तिथल्या जास्तीत जास्त पदार्थांत तांदूळ असतो.पण इतका भात खाऊनही त्यांचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.

भात कसा शिजवायचा त्याच्या काही ट्रिक्स जाणून घ्या आणि वजन करा कमी.

कुकरमध्ये भात शिजविण्यापेक्षा बाहेर पातेल्यात भात शिजवा. त्यासाठी एक मोठे पातेले घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि उकळवा.

भिजवलेल्या तांदळातील पाणी काढून पातेल्यात उकळत असलेल्या पाण्यात तांदूळ मिक्स करा. त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि भात मंद आचेवर शिजू द्या. हवं तर झाकण अर्धवट ठेवा. यामुळे पाणी आणि भात शिजल्याचा तुम्हाला व्यवस्थित अंदाज येऊ शकतो. मध्येच तांदूळ शिजला की नाही हे तुम्ही हाताने तपासून पाहू शकता.

भात शिजल्याचे कळताच आतील अतिरिक्त पाणी चाळतीत गाळून घ्या. हे अतिरिक्त पाणीच तुमचे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरतेसर्व पाणी काढल्यानंतर वूडन स्टिक अथवा चमच्याने तांदूळ व्यवस्थित ढवळून घ्या. यामुळे त्यात वाफ राहणार नाही. असा सुटसुटीत, मोकळा भात खाण्यासाठी तयार आहे आणि यामुळे तुमचे वनज वाढत नाही.

आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी लोकमत सखीशी बोलताना भात खाण्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करत भात कसा खावा, कसा शिजवावा याबाबत सांगितले आहे. डॉ. परीक्षित शेवडे सांगतात, ”रोजच्या स्वंयपाकात भात शिजवताना काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की तुम्ही वापरत असलेला तांदूळ हा जुना असावा. किमान वर्षभर जुना असलेला तांदूळच वापरावा. जर तांदूळ जुना नसेल तर तांदूळ शिजवण्याआधी कोरडे तांदूळ परतून घ्या. यामुळे तांदळातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होईल. भात शिजवताना कुकरऐवजी ओपन वेसल्सचा वापर करा ज्यामुळे भात जास्त पौष्टीक होईल.”



*वरण-भात, तूप,लिंबू बेस्ट कॉम्बिनेशन…*
महाराष्ट्रीयन जेवणाची पद्धत वरण भात तूप-लिंबू हे बेस्ट कॉम्बिनेशन आहारात असेल तर कोणताही त्रास उद्भवणार नाही.  कारण यातील घटक-तूपातील फॅटी एसिड, लिंबातील एसिटीक एसिड यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि भाताचे पोषण मूल्य अधिक वाढते.

*भात आणि पोट सुटण्याचा काही संबंध आहे का…?*
भारतात ९० टक्के लोकांचे स्टेपल डाएट हे भात आहे. पूर्वीपासून  भात खाणाऱ्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली होती असं नाही. पूर्वी अंग मेहनत खूप व्हायची, आता ती होताना दिसत नाही म्हणून पोट सुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्ही व्यायाम करणार नाही आणि फक्त भात बंद कराल, यामुळे पोटं सपाटीला जातील असं अजिबात होणार नाही. भात योग्य पद्धतीने शिजवल्यास भात खाण्याचा कोणताही त्रास होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »