कावीळावर घरगुती उपचार: कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत..
कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत.
हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न वरचेवर खाल्ल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवी पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव मिक्स होऊन अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात.
यामध्ये लिवर सुजणे आणि भूक कमी लागणे या समस्या होतात.
कावीळ म्हणजे ज्याला हिंदी मध्ये पिलिया म्हणतात हा आजार लीवर (यकृत) च्या संबंधातील आजार आहे. कावीळ एक साधारण आजार वाटतो पण जर याचे वेळीस उपचार केले गेले नाही तर हे भयंकर रूप धारण करू शकते यामध्ये रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या जीवघेण्या आजारासाठी घरगुती उपाय सांगत आहोत. जे तुमच्या काविळीला बरी करण्यास उत्तमा ठरेल. हा उपचार कावीळ मग तो हेपेटाइटिस A, B, किंवा C किंवा मंग बिलरुबिन, ESR वाढलेले असेल तरीही फायदेशीर राहील.
टीप: कावीळ हा एक गंभीर आजार आहे आणि योग्य उपचार मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तथापि, काही सामान्य घरगुती उपचार आहेत जे कावीळाची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात:
काविळी पासून सुटका मिळवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय
शहाळे (हिरवे नारळ) :
रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळेचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.
कांदे :
कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ तुकडे करून यामध्ये लिंबू पिळणे त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळे मीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते.
चण्याची डाळ :
रात्री झोपण्या अगोदर चण्याच्या डाळीला भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करा. हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यामुळे कावीळ बरी होण्यास मदत होते.
*सुंठ :*
सुंठ चा वापर करून देखील कावीळचा उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावा. ही सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे कावीळी पासून सुटका होण्यास मदत होते.
लसून :
कावीळी मध्ये लसून देखील फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून कुड्या घ्याव्यात आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटावे त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाण्यास मदत होते.
चिंच :
चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होण्यास मदत होते.
मध आणि आवळा रस :
एक चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळण्यास मदत होते.
आहार:
फळे आणि भाज्या: फळे आणि भाज्या हे अँटिऑक्सिडेंट आणि पोषकद्रव्ये यांचा उत्तम स्रोत आहेत जे यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात. संत्री, द्राक्षे, पालेभाज्या आणि ब्रोकोली यांचा समावेश करा.
कोरडे मेवे आणि बिया: बदाम, अक्रोड आणि तीळ यांसारखे कोरडे मेवे आणि बिया हे पौष्टिक चरबी आणि फायबरचे उत्तम स्रोत आहेत जे यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतात.
तंतुमय पदार्थ: ओट्स, गहू आणि बाजरी यांसारखे तंतुमय पदार्थ यकृतातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करू शकतात.
दुग्धजन्य पदार्थ: दही आणि लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहेत जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात.
पाणी: पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे, जे यकृताला विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
इतर उपाय:
व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते.
तणाव कमी करा: तणावामुळे यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. योग, ध्यान किंवा श्वास घेण्याच्या व्यायामाद्वारे तणाव कमी करण्याचे मार्ग शोधा.
पर्याप्त झोप: झोपेच्या वेळेचा अभाव यकृताचे कार्य बिघडवू शकतो. दररोज 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
धूम्रपान टाळा: धूम्रपानामुळे यकृताचे नुकसान होते.
मद्यपान मर्यादित करा: जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृताचे नुकसान होते.
टीप: हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे उपचार कावीळाचा इलाज करू शकत नाहीत. ते केवळ लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. योग्य उपचार मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.