दात ठणकायला लागले तर काय करायचं ?दाढ दुखत असेल तर करा हे घरगुती उपाय..

0

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. दात किंवा दाढदुखीची कारणे – जे लोक जास्त कडक पदार्थ खातात त्यांना दाढदुखी सुरू होते. याशिवाय बॅक्टेरिया आणि संक्रमण देखील याचे कारण असू शकते. दातांच्या आत एक पल्प असतो जो मज्जातंतू नर्व टिश्यूस आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला असतो. या पल्पच्या नसा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील असतात. जेव्हा या नसांना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा त्यात तीव्र वेदना होतात.

दाढ दुखीवर कोणते घरगुती उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या..

लवंग :- दाढ दुखी सुरु झाली की पहिला उपाय हा लवंग वापरण्याचा सांगितला जातो. लवंग मध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. ज्या ठिकाणी जास्त वेदना होत आहेत त्यावर लवंग तेलाचे काही थेंब लावून मालिश केल्याने बराच आराम पडतो. याशिवाय दुखत असलेल्या दातामध्ये आपण अख्खी लवंगही ठेऊ शकता. काही वेळातच दात दुखी कमी होण्यास मदत मिळते.

पेरूची पाने :- पेरूच्या पानांमध्ये असणारे घटक दातांचं आणि एकंदरीतच तोंडाचं आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरुच्या पानांमध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. दातदुखी थांबविण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. पेरूची पाने धुवून पाण्यात टाका त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी उकळून थंड झाल्यावर या पाण्याने गुळण्या करून मग या पाण्याचा वापर करून दात स्वच्छ घासून घ्यावेत. हा उपाय दिवसातून २ ते ३ तीन वेळा करावा. त्यामुळे दुखत्या दातांना बराच दिलासा मिळेल व हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यास याची मदत होईल.

बर्फ:- NCBI च्या एका रिपोर्टनुसार, कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी किंवा ठीक करण्यासाठी बर्फ हा खूप महत्वाचे योगदान देतो.गालाला शेक द्या. ज्या भागात जास्त वेदना होत आहेत त्या भागाला अधिकाधिक शेक द्या. जर खूपच जास्त वेदना होत असतील तर दिवसातून अनेक वेळा ही क्रिया करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.

तुळस :- तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.

कांदा :- कांद्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्मदेखील असतात. कांदा सोलून त्याचा तुकडा दुखणाऱ्या भागावर काही काळ ठेवा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. हा कांद्याचा तुकडा काही वेळाने फेकून द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »