Farm Pond Subsidy : सोलापुरात शेततळ्यासाठी १७ लाखांचे अनुदानवाटप

0

Farm Pond Subsidy : सोलापुरात शेततळ्यासाठी १७ लाखांचे अनुदानवाटप

सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.
Solapur News : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेतून जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ४० शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले असून, त्यातील ३४ शेतकऱ्यांना १७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
श्री. शिंदे म्हणाले, की पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.
विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येत आहे. गत आर्थिक वर्षात जिल्हाभरातून ८ हजार १५६ अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले.
त्यातील महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने ९०१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ६५३ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. त्यातील ४० अर्ज अनुदानासाठी मंजूर करण्यात आले असून, ३४ शेतकऱ्यांना १६ लाख ८६ हजार ९९३ रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »