आता Toll प्लाजा, FasTag विसरा, सरकार लवकरच थांबवणार टोलवसूली..

0

महामार्गांवर अनेक ठिकाणी टोल नाके उभारलेले असून येथे टोलवसूली केली जाते.सरकार लवकरच टोल रद्द करण्याचा विचार करत आहे.अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.सध्या ट्विटरवर नितीन गडकरींचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे.सरकार टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत असून त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले आहे.

टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल.या यत्रणेंतर्गत, युजर्स महामार्गावर जेवढे किलोमिटर अंतर पार करतील, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. यामुळे युजर्सना सेव्हिंगचीही संधी मिळेल.टोल टॅक्सबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आता आम्ही टोल संपवत आहोत आणि सॅटेलाइट बेस टोल वसुली यंत्रणा असेल.तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि तुम्ही जितका रस्ता कव्हर कराल तितकी रक्कम आकारली जाईल. त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल. पूर्वी मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी ९ तास लागत होते, आता ते २ तासांवर आणले आहे.मात्र, ही नवी प्रणाली कधी सुरू होणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.तसेच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अद्याप कोणतीही मुदत जाहीर झालेली नाही.

सध्या टोल भरण्यासाठी फास्टॅग (Fastag) प्रणाली आहे. ही एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली होती, जी स्वयंचलित टोल प्लाझावर टोल टॅक्स भरते. त्याच्या मदतीने, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ सरासरी ४७ सेकंदांवर आली आहे, जो पूर्वी सरासरी ७१५ सेकंद होता.

FASTag म्हणजे काय?
फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने ते टोल प्लाझावर स्वयंचलित टोल पेमेंट करते. हे कार किंवा इतर वाहनाच्या विंड स्क्रीनवर स्थापित केलेले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »