टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही! टोयोटाचे हे नवीन मॉडेल देणार टाटा पंच, ह्युदाई एक्स्टर,महिंद्रा एक्सयूव्हीला टक्कर..

0

मारुतीची कार टोयोटाच्या शोरुममध्ये येत आहे.टोयोटाची स्वस्तातली टैसर एसयुव्ही येते आहे .टोयोटा ही ४ मीटर एसयूव्ही घेऊन पुन्हा बाजारात येत आहे.Toyota चे हे मॉडेल २०२४ साली ३ एप्रिल रोजी भारतीय बाजारात लॉन्च केले जाईल.मारुती सुझुकीची Maruti Suzuki Fronx ही कार टोयोटाच्या ताफ्यात टैसर या नावाने येणार आहे. कंपनीने नुकतेच Urban Cruiser Taisor या नावाने ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. ही कार इतर कार्स ला टक्कर देणार आहे.

मारुतीची ही कार बलेनोवर आधारीत आहे. मारुतीने गेल्या वर्षी ही कार लाँच केली होती. तिचा लुक एसयुव्हीसारखा करण्यात आला आहे. आधीच्याच रिबॅज्ड कारप्रमाणे टोयोटा फ्राँक्सचाच लुक कायम ठेवणार आहे. फक्त ग्रिल, बंपर, लाईट्स आदीमध्ये बदल केले जाणार आहेत.टोयोटाचे हे नवीन मॉडेल केवळ मारुती सुझुकी फ्रंटलाच टक्कर देणार नाही, तर टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० सारखी अनेक वाहनेही याच्याशी स्पर्धा करतील.

ही कार टोयोटाद्वारे मारुतीची चौथी रिबॅज केली जाणारी कार असणार आहे. यापूर्वी टोयोटाने मारुती ब्रेझाला पहिल्यांदा अर्बन क्रूझर एसयुव्ही म्हणून विकली होती. परंतु तिला यश आले नव्हते. अर्टिगाला रुमियन आणि बलेनोला ग्लँझा म्हणून टोयोटा विकत आहे. या गाड्यांमुळे टोयोटाची विक्री काही प्रमाणावर वाढली आहे.

टोयोटा टैसर (Toyota Taisor)  ही आगामी B2-सेगमेंट SUV आहे ज्यामध्ये ५ लोक बसू शकतात.आगामी Toyota Taisor विक्रीसाठी येईल तेव्हा, त्याची किंमत रु. ७.६० लाख आणि रु.१३.५० लाख दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »