Crop Damage : भाजीपाल्यासह पिकांना गारपिटीमुळे मोठा फटका

0

Crop Damage : भाजीपाल्यासह पिकांना गारपिटीमुळे मोठा फटका

विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.७) पावसासह अनेक भागात गारपीट झाली.
Nagpur News विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.७) पावसासह अनेक भागात गारपीट (Hailstorm) झाली. याचा फटका मिरची, कांदा यांसह भाजीपाला पिकांना (Crop Damage) बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात वीज कोसळून एक जण दगावला, तर यवतमाळ येथे रेणुकादास शिंदे यांची बैल जोडी ठार झाली.
नागपूर जिल्ह्यात गहू, कांदा, संत्रा व लिंबाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घराचे छत उडाले. अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे व फळबागाचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुकांतर्गत जळका पटाचे येथील शेतामध्ये शुक्रवारी (ता. ७) हनुमान जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मलातपूर येथील गोपाल मनोहर करपते या ठिकाणी पोहोचले असता अचानक पाऊस सुरू झाला व वीज कोसळली. यात करपते यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कुऱ्हा येथे गारपिटीची नोंद करण्यात आली. शेंदुर्जना घाट येथे कापणी केलेल्या गव्हासोबतच संत्र्याला फटका बसला.
नांदगाव खंडेश्वर, तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. महागाव तालुक्यातील हिवरासंगम परिसरात वीज पडून बैलजोडी ठार झाली. धार बुद्रुक येथील शेतकरी रेणुकादास वामन शिंदे हे संगम शिवारातील शेतात काम करत होते.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »