तुमचे वोटर ID कार्ड हरवले आहे का? बघा नवीन मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया..

0

लोकसभा 2024 निवडणुका पुढील महिन्यात म्हणजेच १९ एप्रिलपासून सुरु होणार आहेत.जर तुमचे Voter ID कार्ड हरवले तर तुम्ही मतदान करू शकत नाही.जाणून घ्या नवे Voter ID डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया.मतदार ओळखपत्र हे तुमचे ओळखपत्र म्हणून काम करते.तुम्ही नवीन Voter ID Card ऑनलाइन सहजपणे डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.नवे Voter ID डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया :

सर्वप्रथम तुमचे Voter ID Card ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा फोनमध्ये नेशन व्होटर सर्व्हिस पोर्टल (https://voters.eci.gov.in/) ओपन करा.

यानंतर आता तुम्हाला या पोर्टलच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या E-Epic डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा.

आता पुढील विंडोवर तुम्हाला लॉगिन पेज दिसेल.

या पेजवर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी किंवा EPIC क्रमांक टाकून तुम्ही तुमचे Voter ID शोधू शकता.

मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि रिक्वेस्ट OTP वर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला तुमच्या नंबरवर एक OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »