नाशिकमध्ये दुधाचे दर वाढले! म्हशीचे दूध ८० रुपये लिटर तर गायीचे दूध ५५ रुपये..

0

नाशिकमध्ये दुधाचे दर वाढले आहे.म्हशीचे दूध ₹80 प्रति लिटर तर गायीचे दूध ₹55 प्रति लिटर असे झाले आहे . मार्च महिन्यापूर्वीच टँकरने पाण्याची द्विशतक पूर्ण पावसाअभावी मका, बाजरी आणि इतर पिके नापीक शेतकऱ्यांना चाराही उपलब्ध नाही,चाराच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शहरातील दुधाच्या किंमतीही वाढल्या आहेत. 

यामुळे सर्वसामान्यांवर दुष्काळाची झळ बसली आहे.म्हशीचे दूध ८० रुपये लिटर आणि गायीचे दूध ५५ रुपये लिटरला विकले जात आहे. ग्रामीण भागातील दूध डेअरीमध्ये हे दर अनुक्रमे ४० आणि २५ रुपये असल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दूध डेअरीवाल्यांनी गायीच्या दुधाचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत.ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यापेक्षा पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. चारा दुसऱ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून विकत आणणे शक्य आहे. पण पाणी मिळणे अवघड होत असल्याने टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते. पाच हजार लिटरच्या टँकरसाठी पंधराशे रुपये खर्च करावे लागतात.

शहरातील व ग्रामीण भागातील दुधाच्या दरात मोठी तफावत असते. पण चाराटंचाईमुळे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना चाऱ्यापेक्षाही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. जनावरांसाठी आत्तापासूनच पाणी विकत घ्यावे लागत आहे.

दुधाच्या दरांमध्ये फरक (लिटर मागे)

शहरात म्हशीचे दुधाचा दर ८० ते ८५ रुपये असा आहे तर ग्रामीण भागात ४० ते ५० रुपये असा आहे.
शहरात गावठी गायीचे दूध ५० ते ५५ रुपये प्रति लिटर असून ग्रामीण भागात २५ ते ३५ रुपये असा आहे.
तर गिर गायीचे दूध ७० ते ८० रुपये शहरात ४० ते ५० रुपये प्रति लिटर ग्रामीण भागात असे विकले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »