शिक्षकांनी केली घरोघरी जाऊन मतदान करण्याची जनजागृती
शिक्षकांनी केली घरोघरी जाऊन मतदान करण्याची जनजागृती
काजीसांगवी-(उत्तम आवारे) मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभाग वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करत , शाळेत मतदान जागृतीपर स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांद्वारे रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
आज स्विप कार्यक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांनी प्रत्येक कुटुंबाची गृह भेट घेऊन मतदान जनजागृती केली .
आपल्या गावाचे मतदान हे शंभर टक्के व्हावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी स्विपकार्यक्रमांतर्गत गृहभेटी उपक्रम राबवून गावातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक न्याहारकर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने गृह भेटीचे नियोजन करण्यात आले. गावातील बी. एल.ओ.,(BLO) श्री सतीश अहिरे व संतोष वाघ यांनी देखील सहभागी होऊन मतदान जनजागृती केली.
या गृहभेटी प्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते.