नाशिक (काजी सांगवी) : संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मतदान जनजागृती अभियान..

0

संत ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मतदान जनजागृती अभियान
काजीसांगवीः (उत्तम आवारे) चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय संविधान लोकशाही बळकट करण्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजविणे आवश्यक आहे त्याकरिता घेण्यात आले.
भारतीय संविधान लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. अशा या भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान विषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. नवीन मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृतीसाठी होणे गरजेचे आहे.

हया निमित्ताने जिल्हयात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रम ही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेले आहेत. गांव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्याह निद्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काही उद्दिष्ट समोर ठेवली आहेत. एकूण लोकसंख्येमधील मतदारांचे प्रमाण व 18 वर्षावरील मतदारांची संख्या ही समान असावी. यासाठी उपक्रम राबवून ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण का कमी आहे. याची कारणे शोधून त्यामध्ये लक्ष घालणे अपेक्षित आहे. भारत निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. कार्यक्रमाची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. भारत निवडणूक आयोगाने आर्थिक अनुदानही या कार्यक्रमाकरीता दिले आहे.
एकूण लोकसंख्येमधील महिलांचे प्रमाण आणि मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे. हे प्रमाण वाढविण्यासाठी महिला बचत गट, अंगणवाडी केंद्र, दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच महिलांच्या सामाजिक संघटना, नागरी संस्था इत्यादी सोबत चर्चा, परिसंवाद, मेळावे आयोजित करण्यात यावेत. सणासुदीच्या काळात रांगोळी स्पर्धा, खाद्य महोत्सव इत्यादींच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करावी.
18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण सध्याच्या 35 ते 40 टक्कयांवरुन 80 टक्के इतके व्हावे. युवक मतदारांची नोंदणी वाढविण्याकरीता विद्यापिठे, महाविद्यालये आणि त्यांचे युवक प्रतिनिधी यांचेशी संवाद साधण्यात यावा. सर्व विद्यापिठाचे ‘कुलसचिव’ यांना या प्रयोजनासाठी ‘कॅम्पस ऍ़म्बसडर’ म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रार्चायाना ‘नोडल अधिकारी’ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हया कार्यक्रम शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे प्रामुख्याने गरजेचे आहे.
हया जनजागृती कार्यक्रमास संत ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य संसारे मॅडम, पत्रकार सुखदेव बाबा केदारे, शिक्षक शिवाजी भोकनळ , काळे सर, नरोटे सर तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व शाळेचे कर्मचारी शिवाजी वाकचौरे, रामभाऊ भोकनळ आदी उपस्थित होते…

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »