स्वानंदसुख निवासी सदगुरु जोग महाराज वारकरी बालसंस्कार शिबिर निर्विघ्न पार पडले

0

स्वानंद सुखनिवासी सदगुरु जोग महाराज वारकरी बालसंस्कार शिबिर किर्तनकेसरी हभप किरण महाराज बोरसे आयोजित वारकरी शिबीर अतिशय चांगल्या प्रकारे निर्विघ्न पार पडले. शिबिरात हभप किर्तनकेसरी शुभम महाराज पानगव्हाणे, आणि सचिन महाराज देशमाने तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था संस्थापक हभप अर्जुन महाराज गांगुर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरच्या समारोपाचे किर्तन हभप समाधान महाराज पगार यांचे करवी झाले. तसेच शिबिरातील विद्यार्थ्यांनी टाळाची साथ केली असून मृदंग सेवा हभप सागर महाराज बोरगुडे आणि हभप मयुरेश महाराज कवात यांची तर हभप अक्षय महाराज वाघ हभप दौलत महाराज ठोंबरे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोपरे, हभप वैभव महाराज मोरे, हभप निळोबा महाराज बोरसे,आदी यांची गायणाची सेवा तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सर्व विद्यार्थ्यांचे आईवडील आणि हभप नवनाथ महाराज गांगुर्डे (विश्वस्त, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर) हभप शिवाजी महाराज वाघ जोपुळकर, वैराग्यमूर्ती सोमनाथ दादा मोरे, हभप अभिजीत महाराज देशमुख
विशेष आभार :- अन्नदानं सर्व दानं प्रधानं या न्यायानुसार वारकरी शिबिरास अन्नदान करणाऱ्या सर्व दानशुर दात्याचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »