Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट

0

डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत आज (गुरुवारी दुपारी २:४५ वाजता ) बॉयलरचा स्फोट झाला.
स्फोट इतका तीव्र होता की दोन ते तीन किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला.स्फोटानंतर आग लागून ती वेगाने पसरत आसपासच्या तीन कंपन्यांपर्यंत पोहोचली.या स्फोटात आणि आगीत ३० ते ३५ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम जोरात सुरू आहे.
स्फोटाचे आणि आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे की स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की त्यांना भिंती हादरल्यासारख्या वाटल्या.स्फोटानंतर काही वेळासाठी रस्त्यावर धुराचे मोठे लोट दिसत होते.या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडण्यास भाग पाडले गेले.स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करत आहेत.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »