पायी पालखी सोहळ्यास मुलभुत सुखसुविधा देणे साठी पालकमंत्र्यांना निवेदन!
दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे):
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी पालखी सोहळ्यास आरोग्यसेवा, फिरते शौचालय, स्नानगृहे, अँम्बुलंस,.फिरतादवाखाना,अनुभवी पोलिस संरक्षण इ. वारकऱ्यांच्या मुलभुत सुखसुविधा देणे साठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देताना संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधि संस्थानच्या अध्यक्षा ह.भ.प.सौ.कांचनताई सतीश जगताप (उकार्डे), प्रसिद्धी प्रमुख तथा विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, विश्वस्त ह.भ.प.राहुल महाराज साळुंके,किर्तनकार ह.भ.प.मधुकर महाराज शेलार,व समवेत वारकरी उपस्थित होते.