समाजसेवक भागवत झाल्टे यांनी केला आगळा वेगळा वाढदिवस
सध्याची दुष्काळ परिस्थिती बघता वाढदिवस साजरा न करता अनोखा पद्धतीचा उपक्रम राबविला
दिघवद वार्ताहर ( कैलास सोनवणे):
श्री भागवत झाल्टे चांदवड तालुका प्रतिनिधी व युवा क्रांती फाउंडेशन माहिती अधिकार संघटना चांदवड तालुका अध्यक्ष यांनी आज अनोख्या प्रकारचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला काहीतरी वेगळे करण्याची धडपड व जिद्द परिस्थिती गांभीर्य ओळखून आपण समाजाचे काहीतरी देन लागतो या भावनेने तरुण पिढीसमोर एक आव्हान प्रस्तुत केले
सध्याची परिस्थिती बघता पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने वाडी वस्ती मळ्यांमध्ये गोरगरिबांना टँकरद्वारे पाणी वाटप केल गोरगरीबांना काही किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत श्री भागवत झाल्टे यांनी वाढदिवस साजरा न करता हा नविन उपक्रम राबविला सध्या परिसरात रस्त्यावरती केक कापणे तोंडाला लावणे बैनर बाजी करणे मोठमोठ्या पार्ट्या करणे यामध्ये तरुण मित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वादी वाद वाढत आहे हे न करता सध्याची दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन सध्या पाण्याची अती तिव्र टंचाई भासत आहे म्हणून त्यांनी कातरवाडी रापली एक लव्य नगर वडगांव पंगु परिसरात पाणी वाटप करुन उपेक्षितांची तहान भागून वाढदिवस साजरा केला आशा आहे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व समाजसेवकाला माझा सॅल्यूट