आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा!

0

दिघवद वार्ताहर( कैलास सोनवणे ) श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद उसांडून वाहत होता//आवडते मज मनापासून शाळा लावीते लळा जशी माऊली बाळा //शाळा आहे प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्कारची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे याच पार्श्वभूमीवर दिगवत विद्यालयातील 1993 ते 94 मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले या मेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी विठ्ठल गांगुर्डे प्रभाकर गांगुर्डे अभिजीत शेडगे पिंटू भोयटे यांनी केले अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी 30 वर्षानंतर एकत्र भेटले त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद उसांडून वाद होता यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगतात प्रथम शाळेचे माजी मुख्याध्यापक सदाशिवराव शेडगे पर्यवेक्षक उमाकांत वारके व शिक्षकांनी केलेल्या संस्काराचे यावेळी कौतुक केले व संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष रसाळ गुरुजी व संचालक मंडळाने शाळेसाठी घेतलेले परिश्रम व ग्रामीण भागातून घडलेलो आम्ही इंजिनीयर डॉक्टर वकील न्यायाधीश शिक्षक वायरमेन आरटीओ विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेले शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीला असलेल्या विद्यार्थी या शाळेने घडविण्यात आल्याने यांचे कौतुक करण्यात आले यावेळी 70 ते 80 माजी विद्यार्थी उपस्थित होते शेवटी सर्वांनी स्ने भोजनाचा आनंद लुटला आम्हाला अजून पुढे मेळाव्याचे आयोजन चांगल्या पद्धतीने करावयाच्या आहेत असे विठ्ठल गांगुर्डे यांनी सांगितले

दत्तू गांगुर्डे, शरद हांडगे, साहेबराव शेडगे, जयश्री कोकाटे, रेणुका बोनाटे आनिता निमसे, अलका हांडगे, देवराम शिंदे, संजय जाधव, ज्ञानेश्वर गांगुर्डे, राजू साठे ,नारायण गाडे, चांगदेव शिंदे, अरुण ठाकरे ,भगवान गांगुर्डे, भारत गांगुर्डे, प्रकाश जेऊघाले, खंडेराव ठाकरे, रवींद्र तांबडे ,मंगेश कुंभार्डे, गंगाधर गांगुर्डे, शंकर शिंदे, धोंडीराम शेडगे ,मारुती नवले ,कैलास नवले, तुकाराम गोडसे, खंडेराव जाधव, साहेबराव ठोंबरे, शरद केदारे, माधव साठे, दीपक ठाकरे, प्रसाद बारगळ, अरुण ठाकरे, मच्छिंद्र टोपे, बाळकृष्ण वाटपाडे ,सोमनाथ गांगुर्डे, बबन गांगुर्डे, अरुण ठाकरे, माधव साठे, दिनकर गांगुर्डेआदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »