राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने, राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.विदर्भात २५ व २६ मार्च रोजी वादळी वार्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. २५ मार्च रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यात तसेच २६ मार्च रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातुर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात, २७ मार्च रोजी बुलडाणा, वाशिम अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ या जिल्ह्यात तर २८ मार्च रोजी अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.