वाहेगांवसाळ ते काळखोडे जलजीवन मिशन योजनेचे काम नित्कुष्ठ

0

रेडगांव खुर्द  (दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे): दि २२ चांदवड तालुक्यातील काळखोडे ते वाहेगांवसाळ या दरम्यान जलजिवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाईपलाईनचे काम अत्यंत नित्कुष्ठ दर्जाचे होत असल्याने हे काम वाहेगांवसाळ ग्रामपंचायतीने बंद पाडले.कामाबाबत असंख्य तक्रारी आल्याने जि.प. ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करून सबंधित ठेकेदाराला पाईपलाईन काढण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी  हर घर जल योजना म्हणजेच जलजिवन मिशन.मात्र ही योजना   मे 2024 पर्यंत पुर्ण करावयाची आहे. योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी  सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार यांना अनुभव नसतानाही कामे देण्याचा निर्णय झाला. परंतु ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधींची असल्याने या सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना कोणताही अनुभव नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होत आहे. काळखोडे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी    वाहेगांवसाळ वरुन पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र सबंधित ठेकेदाराने एक मिटर खोदकाम करणे आवश्यक असताना  एक ते दीड फुटच पाईपलाईन खोदली.तीही रस्त्याच्या अगदी जवळून साईडपट्टीत खोदली.काही ठिकाणी तर रस्त्यालाच छेद दिला. काही ठिकाणी डांबरी रस्ता जेसीबीने उखडून टाकला.पाईपलाईन रस्ता सोडून दोन ते तीन मीटर  बाहेर करणे आवश्यक असते. मात्र ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच खोदकाम केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे परीसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी काम बंद पाडले. तक्रारी वाढल्याने जि.प.चे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महाजन साहेब यांनीही पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामासाठी नव्वद लाख अंदाज पत्रकीय रक्कम मंजूर असुन ठेकेदार सुशांत गाढे यांनी हे  काम घेतल्याचे समजते.

” सबंधित ठेकेदाराने वाहेगांवसाळ ते काळखोडे रस्त्याचे संपूर्ण नुकसान केले. साईडपट्टीतच पाईपलाईन खोदुन रस्त्यावर माती टाकली. रस्ता उखरुन ठेवला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रस्ता पुर्ववत करावा.”

संदिप पवार – सरपंच वाहेगांवसाळ

” हे काम अत्यंत नित्कुष्ठ झाले आहे. वरीष्ठ अधिका-यांसोबत पाहणी करून पाईपलाईन काढून घेण्यास सांगितले आहे. काम बंद करण्याची सुचना दिली.”

वासंती बोरसे – सहाय्यक अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा योजना चांदवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »