CISF Recruitment 2024: नोकरी शोधणाऱ्यांनो, लक्ष द्या!सीआयएसएफमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी !1130 पदांसाठी भरती, 65 हजार पगार!

0

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) मध्ये तुमच्यासाठी एक मोठी संधी उघडली आहे. सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबल (फायरमन) पदासाठी 1130 जागांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही एक प्रतिष्ठित नोकरी असून, देशाच्या सुरक्षेसाठी काम करण्याची संधी मिळते.

पात्रता:
बारावी उत्तीर्ण (विज्ञान शाखेतील उमेदवारांना प्राधान्य)
वय: 18 ते 23 वर्षे
कसे करावे अर्ज: CISF ची अधिकृत वेबसाइट पहा.
आवश्यक सर्व माहिती भरून फॉर्म सावधानीपूर्वक भरा.आवश्यक सर्व दस्तावेज अपलोड करा. निर्धारित शुल्क भरा.

महत्त्वाचे:

अर्ज दाखल करण्यास ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.पात्र उमेदवार ३० ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात.कॉन्स्टेबल फायरमन या पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. देशभरात एकूण ११३० पदे रिक्त आहेत. यातील ७२ पदे महाराष्ट्र राज्यात आहेत. सीआयएसएफच्या भरती अंतर्गत महाराष्ट्रातील ७२ पदे पुढील प्रमाणे विभागलेली असतील. संपूर्ण राज्य खुला वर्ग २७ पदे आरक्षित वर्ग ३४ पदे एकूण ६१ पदे. तर नक्षल किंवा मिलिटन्सी क्षेत्र खुला वर्ग ५ पदे तर आरक्षित वर्ग ६ पदे एकूण ११ पदे.

कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पात्रता बारावी उत्तीर्ण इतकी आहे.सीआयएसएफमधील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १८ ते २३ वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. यासाठीच्या अर्जाचं शुल्क १०० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क द्यावं लागणार नाही.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलत कॉन्स्टेबल फायरमन या पदावर नेमणूक झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना २१,७०० ते ६९,१००/- इतके वेतन दिले जाईल.कोणत्याही फसवणुकीपासून वाचण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइटचाच वापर करा.

अधिसूचना येथे वाचा-

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »