कांदा लागवड रोग आणि त्याचे नियंत्रण
*🌰 कांदा लागवड
*🐛 महत्त्वाचा रोग आणि त्याचे नियंत्रण :*
*🐜 करपा रोग (अल्टरनेरिया ब्लाईट) :*
या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण उष्ण आणि दमट हवामानात म्हणजे खरीप हंगामात जास्त प्रमाणात दिसून येते. खरीप हंगामातील ढगाळ हवामानात आणि पाऊस यामुळे करपा रोगाचा प्रसार ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत होतो, तर रब्बी हंगामात या रोगाचा प्रसार ३८ टक्क्यांपर्यंत होतो.
बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्याच्या पातीवर सुरुवातीला खोलगट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग जांभळट रंगाचा असतो. चट्टे पडण्याची सुरुवात शेंड्याकडून होते. चट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून वाळू लागतात आणि संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते आणि शेवटी सुकून गळून पडते.
हा रोग रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात आल्यास पात जळून गेल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. कांदा पोसत नाही आणि चिंगळी कांद्याने प्रमाण वाढते. कांदे पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कांद्यापर्यंत होतो आणि कांदा सडतो.
कांद्याची निरोगी जोमदार वाढ होण्यासाठी पात रसरशीत हिरवीगार राहून कांद्याचे चांगले पोषण होण्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी करावी.
*१) पहिली फवारणी :*
(लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ५ लीटर वस्त्र गाळ केलेले जीवामृत+ १०० लि.पाणी.
*२) दुसरी फवारणी :*
(लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : १० लीटर वस्त्र गाळ केलेले जीवा मृत + ६ लीटर देशी गायीचे आंबट ताक १५० लि.पाणी.
*३) तिसरी फवारणी :*
(लागवडीनंतर ५ ० ते ६० दिवसांनी) : १५ लीटर वस्त्र गाळ केलेले जीवा मृत + ८ लीटर देशी गायीचे आंबट ताक + २०० लि.पाणी.
*४) चौथी फवारणी :*
(लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसांनी) : २० लीटर वस्त्र गाळ केलेले जीवा मृत + १० लीटर देशी गायीचे आंबट ताक + २०० ते २५० लि. पाणी.
फुलकीडे, थ्रीप्स, अळयांसाठी आपल्या शेत परीस्थिती चा अभ्यास , निरक्षण करून नैसगीक किडनाशक अग्नी अस्त्र , ब्रम्हास्र ,दशपणी अर्कचा वापर करावा.
*दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर आपला व्हॉटसअप नंबर नोंदवा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवून आपले शेती सुजलाम सुफलाम करा.*
🙏🙏🙏🙏