कांदा उत्पादक आणि कांदा बीजोत्पादकांन

0

*कांदा उत्पादक आणि कांदा बीजोत्पादकांसाठी महत्त्वाची नोट*:


1. देशात दहा लाख हेक्टरात तर महाराष्ट्रात पाच लाख हेक्टरात रब्बी कांद्याची लागण होते.
2. हेक्टरी सहा किलोच्या हिशोबाने दहा लाख हेक्टरसाठी 60 हजार क्विंटल बियाणे लागते.
3. आजच्या किमान 4 चार हजार रु. प्रतिकिलो रेटनुसार – – देशातील उन्हाळ कांदा बियाणे मार्केटचे आकारमान -2400 कोटी रुपयांचे आहे.
4. वरील आकडेवारी केवळ उन्हाळ हंगामाची आहे. पावसाळी हंगामाचा वरील आकडेवारीत समावेश नाही.
उन्हाळ कांदा बियाण्याची प्रतिकिलो कॉस्ट किती येते, त्यावर संघटित बियाणे उद्योगाला किती मार्जिन राहतो, हे सर्वविदित आहे. आज छापील किंमतीपेक्षा जास्त रेटने बियाणे विकले जातेय. शिवाय, बियाण्याची गॅरंटी मिळणे अवघड दिसतेय. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील कांदा लागण करणारे शेतकरी आणि मराठवाड्यात कांदा बियाणे प्लॉट घेणारे शेतकरी – हे दोन्ही घटक एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या ‘व्हॅल्यू चेन’ उभ्या राहिल्या पाहिजे, असे आपण नेहमी म्हणतो. कांद्याच्या व्हॅल्यू चेनमधील ‘बियाणे’ ही महत्त्वाची कडी होय. …कांदा बियाणे व्हॅल्यू चेन जर शेतकरी मालकीच्या संस्थांच्या ताब्यात आली तर आजसारखा पेचप्रसंग निर्माण होणार नाही. 
कांदा उत्पादक व बीजोत्पादक या दोन्हींच्या आर्थिक फायद्यासाठी काम करणाऱ्या व्यवस्थेची आज गरज आहे.बियाण्याची उपलब्धता, गुणवत्ता आणि मूल्य या तिन्ही बाबतीत यंदासारखी परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी संघटितपणे काम करण्याचे आव्हान शेतकऱ्यांच्या नव्या पिढीपुढे आहे.
वरील पार्श्वभूमीवर, बीजोत्पादन क्षेत्रातील शेतकरी कंपन्या आणि कांदा उत्पादक विभागातील शेतकरी कंपन्या यांच्यात याबाबत संवाद वाढला पाहिजे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, असा कांदा बीजोत्पादन करार शेतीचा पॅटर्न विकसित होवू शकेल. आजच्या बियाणे रेटनुसार महाराष्ट्रात फक्त उन्हाळ कांद्याचे बियाण्याचे मार्केट 1200 कोटींचे आहे. 
 यात संघटित (कंपन्या+सरकारी संस्था) क्षेत्राचा बियाणे विक्रीतील वाटा यंदा 70 टक्क्यापर्यंत राहण्याचे अनुमान आहे. बाराशे कोटीमधील 25 टक्के हिस्सा जरी शेतकरी कंपन्यांनी, गटांनी वा तत्सम संस्थांनी घेतला तरी 400 कोटी रुपये वाचतील. अर्थात, ही कागदी मांडणी आहे. अशाप्रकारे संस्थात्मक काम उभे करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अनेक मित्रांनी याबाबत फोनद्वारे विचार मांडले. ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »