*खत गोणीतून पिकास अन्नद्रव्य किती मिळतात हे महत्वाचे..!*

0

*खत गोणीतून पिकास अन्नद्रव्य किती मिळतात हे महत्वाचे..!*

*शेतकरी बांधवांनो,*
     *एका विशिष्ठ Grade चे खत दिल्यास खरचं पिकास फायदा होतो का? किंवा खर्चात बचत होते का? याचा आपण कधी विचार केलाय का?*
     *कृषी विद्यापीठ पिकास खत मात्रा ची शिफारस करताना एका विशिष्ठ खताची शिफारस करीत नाही ,शिफारस ही नत्र : स्फुरद: पालाश (NPK) अशी करण्यात येते. त्यानुसार बाजारात उपलब्ध खतांपैकी कमी खर्चात आपल्या पिकास आवश्यक NPK देणारे खत शेतकरी बांधवांनी निवडावे. एका विशिष्ठ खतावर अवलंबून न राहता सद्य परिस्थितीत आवश्यक NPK चे प्रमाण पिकास कमी खर्चात कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे आहे.*
    *उदा. DAP या खताच्या एका गोनीतून N- 9 किलो व P- 23 किलो आपण पिकास देऊ शकतो सध्या बाजार भावा प्रमाणे एका DAP गोणीची किंमत 1200 रू आहे. या ऐवजी शेतकरी बांधवांनी 3 SSP व एक युरिया ची गोनी घेतल्यास येणार खर्च SSP -960 रू (3 गोणी) + युरिया 266 रू =1226 रू असून त्यातून मिळणारे N- 20.7 किलो व P-24 किलो आपण पिकास देऊ शकतो तसेच एकूण खत (Quantity)विचारात घेतल्यास DAP एक गोणी फक्त 50 किलो खत येते त्याच्या ऐवजी SSP व युरिया चे मिश्रण केल्यास 195 किलो खत येते.,शिवाय 11.7 किलो N व 1 किलो P अधिक देता येईल..नाही का?*
     *आता SSP (सिंगल सुपर फॉस्फेट) मध्ये झिंक युक्त व बोरॉन युक्त असे पर्याय देखील उपलब्ध असून आपण आपल्या पिकास या सुष्म अन्नद्रव्यांची मात्रा देखील देऊ शकतात*
      *एका विशिष्ठ खतावर अवलंबू
न न राहता चला आता NPK (नत्र:स्फुरद:पालाश) चे गणित मांडुया व कमीत कमी खर्चात पिकास योग्य खत मात्रा देऊयात..*
  आपला,
*अभिजित जमधडे*
*मोहिम अधिकारी*
*कृषी विभाग नाशिक*🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »