पिकांमध्ये विषाणूजन्य रोग

0


पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रसार रसशोषक किडींमार्फत होत असतो, त्यांनाच व्हेक्टर्स म्हटले जाते. पिकामध्ये अफिडस्( मावा )२७५ प्रकारचे, पांढरीमाशी ४५ प्रकारचे, थ्रिप्स १० प्रकारच्या विषाणूंचा प्रसार करतात. म्हणून सर्वप्रथम विषाणूंचा प्रसार करणाऱ्या किटकांविरूद्ध पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण क़रण्यासाठी कॅलोस सिन्थेसिसची क्रिया जागृत करणे गरजेचे असते. त्यासाठी पिकाला कॅल्शियमची ग़रज असते. कॅल्शियमच्या फवारणीने पिकातील कॅलोस सिन्थेसिसची क्रिया २१ दिवसांकरीता कार्यरत होते म्हणजे पिकातील पेशीभित्तीकेच्या आत एक कणखर आवरण तयार होते. ज्यामुळे पिकांची किड व रोग प्रतिकारशक्ती वाढते.
पिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम सॅलिसिलीक ॲसिड करत असते.पण हे सॅलिसिलीक ॲसिड पानात मिथाईलसोबत बंधनात असते. या सॅलिसिलीक ॲसिडचा मिथाईलसोबतचा बंध तोडल्यानंतर पानात कॅल्शियम मुक्त होऊन, पानांमध्ये सॅलिसिलीक ॲसिडचे प्रमाण वाढते, जे NPR1 जीन्स ६० * ६० पटीने तयार करतात. NPR1 जीन्स विषाणूजन्य रोगांपासून पिकाचा बचाव करतात, पिकामध्ये विषाणूंची नक्कल होऊ देत नाही व नवीन निघणारी फूट जोमात निघते. पिकामध्ये आलेला विषाणू पुर्णपणे घालवणे शक्य नसले तरी त्याचा झालेला प्रादुर्भाव निंयत्रणात आणता येऊ शकतो. विषाणुंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नैसर्गिक इम्युनिटी बुस्टर व कॅल्शियमची फवारणी वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेतपासून घेतल्यास विषाणू रोगाविरूद्ध प्रतिबंध करणे शक्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »