युरीया बाबत लक्षात घेण्याजोग्या बाबी

0

 युरीया बाबत लक्षात घेण्याजोग्या बाबी



– युरीयात ४६ % नत्र असले तरी त्याची उपयोग कार्यक्षमता ( use efficiency) खूपच कमी असते, या हिशोबाने प्रत्यक्ष उपयोगी पडणारा नत्र प्रति किलो भासतो त्यापेक्षा महागच पडतो, 

– देशभरात खप होत असलेल्या रा. खतांपैकी युरीयाचा हिस्सा ५० % अधिक आहे, त्यामुळे देशभरात नत्र :  स्फुरद : पालाश वापराचे गुणोत्तर गेल्या अनेक वर्षांपासून ७ : ३: १ असे विषम आहे, जे ४: २: १ आदर्श मानले जाते, 

– या विषम N : P : K गुणोत्तरामुळे पिकात अन्नद्रव्यांच्या परस्पर संबंधांचा दुष्परिणाम होऊ शकतो , 

– अजूनही मोठ्या प्रमाणात युरीया पिकात फेकून आणि पिक अवस्थेचा विचार न करता वापरला जातो, 

– कोणत्याही पिकाची अशी कोणतीच अवस्था नसते ज्यावेळी फक्त नत्राचीच गरज असते, म्हणून युरीया शक्यतो अन्य घटकयुक्त खतासोबत वापरणे हितावह, 

– युरीया व्यतिरिक्त शेणखत, कंपोष्ट, अमो. सल्फेट, संयुक्त खते, विद्राव्य खते अशा माध्यमातून ही नत्राची पूर्तता होत असते, हे युरीयाची मात्रा ठरवतांना विचारात घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »