तेल फवारणी

0
 
🍊🍈 तेल फवारणी : पद्धती, वैशिष्ट्ये व परिणामकारकता🍋

संकलन: पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क- 9403426096, 7350580311

प्राचीन काळापासून विविध वनस्पती व प्राणीजन्य तेल त्यांच्या अत्युच्च गुणधर्मा नुसार विविध रोगांवर उपचारा करिता उपयोगात घेतले आहेत. कृषी क्षेत्रातील तेलांचा उपयोग किटक व बुरशीजन्य रोगांवर परिणामकारक उपाय म्हणून जगात केला जातो. त्यासंदर्भात आता आपण माहिती घेवुया…

● तेलाची फवारनी करतांना ‘तेल विघटकांचा’ वापर केल्यास तेल पाण्यात मिक्स होतात आणि इतर औषधींसोबत वापर करणे शक्य होते. अन्यथा तेल पाण्यात तरंगत असल्यामुळेच बर्‍याच शेतकरी मित्रांची इच्छा असुनही ते फवारणी करू शकत नाहीत.
● तेल पाण्यात विरघळवीन्या करिता साबनाचा चुरा किंवा सोडा(निरमा) व स्टिकर असे तकलादू आणि मुर्ख पणाचे पर्याय करू, वापरू किंवा कुणास सुचवू सुद्धा नये. यामुळेच तेलांचा परिणामकारक वापर आजच्या भारतीय शेतीत होवू शकला नाही.
● प्रत्येकच तेलाचे पाण्यात फवारणीचे प्रमाण ०.५% ठेवावे.
(५मीली प्रती १लिटर पाण्यात)

●(स्वस्त व परिणामकारक 🦴’हाड-मासाचे खत[बोन मॅन्युअर]’, ‘फळमाशीचे ल्युर व ट्रॅप’,  ‘मासोळी, निम, करंज, पॅराफीन तेल’ व ‘तेल -विघटक’, ‘निळे/पिवळे चिकट सापळे शेतकर्यांचे मागनी वरून ‘निसर्ग फाऊंडेशन’ द्वारा अमरावती जिल्हांतर्गत दिल्या जातात.)○

कृषी क्षेत्रातील वापरण्यात येणारे तेलांचे प्रकार-
१. खनिज तेल (उदा.पॅराफीन)
२. वनस्पती तेल (उदा. निम, करंज ई.)
३. प्राणीजन्य तेल (उदा. मासोळी तेल)

त्यातही सरळ वापरातले म्हणजेच आहे त्या स्थितीतील वापरातले (Dormant Oil) आणि गाळण लावून प्रक्रिया करून वापरात घेतलेले (Refind Oil) असे प्रकार आहेत. या दोन प्रकारच्या तेलांचा वापर वातावरणातील थंड पणावर अवलंबून आहे. ‘Dormant oil’ (सरळ घाण्याचे तेल) ची परिणामकारकता जरी जास्त असली तरी त्यांच्या घट्ट व चिकट थरामुळे बहार किंवा नवीन पालवीला मारक ठरू शकतो. परंतू असे तेल उष्ण काळात वापर केल्यास फायदा होतो.
याशिवाय प्रोसेस केलेले ‘रिफाइन तेल’ वापरात घेतांना वातावरणाचा जास्त विचार करण्याची गरज नाही.

तेल वापरतांना घ्यावयाची काळजी-
१. वातावरण/ॠतू (सीझन), किटक व बुरशींच्या प्रकारानुसार तेल कोणते वापरावे याबाबत मार्गदर्शन किंवा अभ्यासाची गरज आहे. नाहीतर आपल्याकडे कशावरही ‘मारा निंम तेल’ हा प्रकार अतीशय मुर्ख पणाचा आहे.
२. तेलांच्या फवारणीत पुर्ण झाडावरील फवारा आवश्यक आहे. (बुंद्या ते शेंडा).
३. फवारणीचे तृषार बिंदू सुक्ष्म असावेत. थेंब नसावा.
४. पावसाळ्यातील अती विलंब काळात तेल फवारणीस वापरू नये.
५. गंधक (सल्फर) किंवा ताम्रयुक्त (कॉपर) बुरशीनाशकां सोबतचा वापर टाळावा.
६. सरळ घाणीचे तेल (Dormant oil) हिवाळ्यात किंवा पालवी (नवती), बहार धरतांना वापरू नये.

🍃किटक व बुरशी विरूद्ध तेलांची कार्य पद्धती- (Mode of Action)

सर्वच तेलांची कार्यप्रणाली जवळपास सारखीच असते. यामध्ये कीटकनाशक म्हणून जेंव्हा वापर होतो. त्यावेळी…
१. तेल फवारणी मुळे होणाऱ्या गॅस उत्सर्जनामुळे किटकांची दमकोंडी होते.
२. किटकांच्या शरिराची जळजळ होते व त्यांच्या शारीरिक बदलात (Metamorphosis) अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच किटकांच्या उत्पत्तीवर असे होतो.
३. किटकांच्या खान्यात तेलांचा अंश गेल्यावर उत्तम पोट विषाचा परिणाम दिसतो.
४. रस शोषक किडींच्या ( पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे व कोळी) रस ग्रहन प्रक्रियेवर असर करत असल्यामुळेच बर्‍याच विषाणू (व्हायरस) चे वहण करन्याची (vectors or carriers) प्रक्रिया थांबते व रोगांचा प्रसार थांबतो.

🍂बुरशीवर जेंव्हा या तेलांचा वापर होतो तेंव्हा…
१. बुरशींचे कवकिय जाळे (Fungal filament) तेलां मधील तेलकट घटकामुळे तुटते. त्यामुळेच बुरशींची वाढ थांबते व तीचा नाश होतो.
२. बुरशीजन्य रोगांचा विस्तार (spred) बुरशींच्या बिजांपासून (Spores) हवा, प्राणी व किटकांच्या माध्यमां द्वारे वहन होवून होत असतो. परंतु, तेलांच्या फवारनी मुळे बुरशींचे बीज आहे त्या स्थितीत एकाच ठिकाणी चिटकून बसतात आणि अपरिपक्व स्थितीतच त्यांचा नाश होतो. त्यामुळेच बुरशीजन्य रोगांच्या अती प्रादुर्भाव काळात तेलांची फवारणीच एकमेव पर्याय ठरतो.
३. काही वनस्पती तेलात गंधकाचा (Sulphur) अंश असल्या कारणावरून त्यांचा बुरशीजन्य रोगांवर उत्तम रितीने परिणाम साधता येतो. उदा. करंज व नीम तेल.

🦠कोणत्या किटक व बुरशीजन्य रोगांवर परिणामकारक ठरेल ?…🕸

किटनाशक म्हणून तेलांच्या फवारणीत मुलायम त्वचेच्या किडी उदा. कोळी(माइट्स), पांढरी माशी (व्हाइट फ्लाय), मावा, कोळी(माइट्स) फुलकिडे (थ्रीप्स), पांढरा ढेकूण (मीली बग) व स्केल याविरुद्ध उत्तम स्पर्श आणि धुरीजन्य विष (कॉन्टॅक्ट आणि गॅस पॉइझन) म्हणून अतीशय परिणामकारक ठरतात.
त्याशिवाय कुरतडून खाणारे अळीवर्गीय किटकांवर पोटविष (स्टमक पॉइझन) म्हणून वापर होतो.

बुरशीजन्य रोगां मध्ये तेला द्वारे कोळशी (ब्लॅक सुटी मोल्ड), भुरी (पावडरी मील्ड्यू) व ठिपके पाडणारी बुरशी (spotted fungus for eg. Rust, Dahiya, Black spot) याविरुद्ध उत्तम परिणामकारकता दर्शवतात.

अशा सर्व वापरानंतर सुद्धा रासायनिक औषधोपचारा नंतरचा ‘रेसीड्यू’ तेल फवारणीत दिसत नाही. करिता तेल फवारणीस अतीशय महत्त्वपूर्ण बाब समजून त्यांचा वापर करावा. धन्यवाद

👉(वरील शोध निबंध समजला नसल्यास किंवा लेखा संदर्भात काही प्रश्न असल्यास अवश्य फोन करा.)

🍊 आमची कार्यालये…🍊
अमरावती, चांदुर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, आकोट, मोर्शी, वरूड, चांदुर रेल्वे व धामणगाव रेल्वे

🙏यापुढील संपुर्ण लेख वाचणा करिता… 🙏

👉’व्हाट्स अप ग्रुप’ करीता ९४०३४२६०९६ आपले नाव व तालुका लिहुन पाठवा.
👉’टेलीग्राम’ ग्रुप “निसर्ग फाऊंडेशन, अमरावती” करिता https://t.me/+Sy6pAdoCkV5CpD1h
👉’निसर्ग फाऊंडेशन, अमरावती’ चा ‘फेसबुक ग्रुप’ 🍊”Amravati Orange”🍊  या ग्रुप करीता पुढिल लींक वापरा… https://www.facebook.com/groups/525633331112489/?ref=share
🙏 निसर्ग फाऊंडेशन चा उद्देश-🙏
कृषी खर्च निवारण,
कृषकांचे सक्षमीकरन व निसर्गाचे संवर्धन.

करिता कृपया या कार्यास व्यवसाय समजू नका. कारण निसर्ग फाऊंडेशन (NGO) हि वित्तीय उत्पन्न क्षेत्रातील उदासीन (Non Profitable Organization) संस्था आहे. धन्यवाद..🙏
🙏 निसर्ग फाऊंडेशन चा उद्देश-🙏
कृषी खर्च निवारण,
कृषकांचे सक्षमीकरन व निसर्गाचे संवर्धन.

करिता कृपया या कार्यास व्यवसाय समजू नका. कारण निसर्ग फाऊंडेशन (NGO) हि वित्तीय उत्पन्न क्षेत्रातील उदासीन (Non Profitable Organization) संस्था आहे. धन्यवाद..🙏 

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »