शेळीपालन

0
शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. शेळीपालनामध्ये तक्त्यांनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्‍यक आहे. जर शेळीपालकांनी नोंदी ठेवल्या तर तो शेळीपालन व्यवसाय नफ्यात आल्याशिवाय राहत नाही.
भारतात शेळीला गरिबांची गाय म्हणतात. विशेषतः ग्रामीण भागातील ७० टक्के गरीब महिला, सुशिक्षित बेरोजगार, अल्पभूधारक, मजूर व भूमिहीन लोक हा व्यवसाय किफायतशीरपणे करतात. भारतात शेळीच्या जवळपास २० जाती आहेत. त्यामध्ये जमुनापारी, सिरोही, सुरती आणि महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमनेरी शेळ्या या जातींना विशेष महत्त्व आहे. 


शेळीपालनामध्ये चांगला व सकस चारा उपलब्ध झाल्यास शेळी २ वर्षांत ३ वेळा विते. २ करडे देणाऱ्या शेळ्यांना विशेष महत्त्व आहे. बोकडाच्या मटणासाठी धार्मिक बंधने नाहीत. चांगल्या प्रतीचे मटण, दूध, खत (लेंडीखत) व कातडी इत्यादी उत्पन्न मिळते. शेळीला १२-१५ चौ. फूट जागा व करडास ७-८ चौ. फूट बंदिस्त जागा व २५ चौ. फूट मोकळी जागा आवश्‍यक असते. 




आपल्याला जर शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. जर आहाराच्या नोंदी, पिलांच्या नोंदी, गाभणकाळाच्या नोंदी व इतर नोंदी जर आपण ठेवू शकलो नाही तर हे शेळीपालन व्यवसाय तोट्यात नेणारे प्रमुख कारण मानले जाते. 


शेळीपालनामध्ये किंवा कोणत्याही पशुपालन व्यवसायामध्ये नोंदवही नसणे ही एक चिंतेची बाब म्हणण्यास काहीही हरकत नाही.




उस्मानाबादी शेळी




  • शारिरीक गुणधर्म :
      शेळीपालन,शेळीपालन व्यवसाय,उस्मानाबादी शेळीपालन,गावरान शेळीपालन,शेळीपालन कसे करावे,शेळीपालन प्रशिक्षण,शेळीपालन शेड माहिती,शेळीपालन मराठी माहिती,शेळीपालन शेड,शेळीपालन जाती,साधे शेळीपालन,शेळीपालन🐐,शेळीपालन फार्म,शेळीपालन खाद्य,#सत्य शेळीपालन,शेळीपालन योजना,शेळीपाळन वेळापत्रक,शेळीपालन पाथर्डी,बंदीस्त शेळीपालन,शेळीपालन चारा नियोजन,शेळीपालन प्रमुख जाती,डोंगरांवरील शेळीपालन,शेळीपालन कर्ज योजना 2020,

    • रंग : प्रामुख्याने काळा
    • कान : लोंबकळणारे
    • शिंगे : मागे वळलेली
    • कपाळ : बर्हिवक्र
    • उंची : ६५ ते ७० सें.मी.
    • छाती : ६५ ते ७०सें. मी.
    • लांबी : ६० ते ६५ सें.मी.
  • वजने :
    • जन्मतः वजन : २.५ किलो
    • पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : ३० ते ३५ किलो
    • पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन : ४५ ते ५० किलो
  • पैदाशीचे गुणवैशिष्टये :
    • वयात येण्याचा काळ : ७ ते ८ महिने
    • प्रथम गाभण राहतांनाचे वय : ८ ते ९ महिने
    • प्रथम विण्याचे वय : १३ ते १४ महिने
    • दोन वितामधील अंतर : ८ ते ९ महिने
    • नर-मादी करडांचे जन्माचे प्रमाण. : १ : १
    • ऋतुचक्र (पुन्हा माजावर येण्याचा काळ) : २० ते २१ दिवस


संगमनेरी शेळी



शारिरीक गुणधर्म :

  • रंग – संगमनेरी शेळयामध्ये पांढरा (६६%) पांढरट तांबडा आणि तांबडा (१६%) रंग आढळतो.
  • नाक – तांबडे, काळा रंग आढळतो.
  • पाय – काळे, तांबडा रंग आढळतो.
  • शिंग – अंदाजे ८ ते१२% शेळया हया बिनशिंगी (भुंडया) आढळतात, उर्वरित 
    शेळयांमध्ये शिंगे आढळतात. शिंगाचा आकार, सरळ, मागे वळलेली आढळतात.
  • कान – कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळयामध्ये उभे किंवा समांतर आढळतात.
  • कपाळ – प्रामुख्याने बर्हिवक्र आणि सपाट.
  • दाढी– संगमनेरी शेळयांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते.
  • शेपटी – शेपटी बाकदार आणि सरासरी लांबी १८.४६+०.२५ सेमी आढळते.
  • स्तन – गोलाकार (४२%), वाडग्यासारखे (२५%), लोंबकळणारे (२२%) आढळतात.
    स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात.

वजने :

वय नर मादी
अ) जन्मतः २.४३+०.११ २.०८ ०.०९२
ब) ३ महिने ९.२० ०.३५ ८.७२ ०.२८
क) ६ महिने १६.२४ ०.९८ १३.८६ ०.२९
ड) १ वर्ष २३.७२ ०.७१ २४.२१ ०३७


    पैदाशीचे गुणवैशिष्टये :

    • वयात येणे (दिवस)- २४५.१९+७.४२
    • प्रथम माजावर येण्याचे वय ( दिवस)- २४८.२३ १३.५६
    • प्रथम गाभण जाण्याचे वय (दिवस )-२८७.०९ १०.१६
    • प्रथम विताचे वय (दिवस ) – ४३२.१८ १२.७७
    • माजाचा कालावधी (तास) – ४१.७३ ०.८०
    • दोन माजांमधील अंतर- २३.८८ ०.४४
    • दोन वेतांमधील अंतर (दिवस)-२३.८८ ३.५७
    • जन्मणा-या करडांची टक्केवारी-१.६२ ०.०४९
    • जन्मणा-या करडांची टक्केवारी १. एक- ४२.२५% २. जुळे- ५४.२३% ३. तिळे- २.८१% ४. चार- ०.७०%
    • दूध- ८० लिटर्स दूध उत्पादन ९० दिवसाच्या वेतामध्ये आढळते.


    सुरती (खानदेशी/ निवानी)



    सुरती (खानदेशी/ निवानी)

    • शारिरीक गुणधर्म :
      • रंगः पांढरा
      • कानः लांबट आणि रुंद
      • कासः चांगली मोठी
      • दुध उत्पादन : दररोज एक ते दिड केलो आणि एका विताच्या हंगामात एकूण १२० ते १५० किलो
      • वास्तव्य : गुजरातमध्ये आणि धुळे ,जळगांव जिल्ह्यांमध्ये
    • वजने :
      • जन्मतः वजन : २.५ किलो
      • पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : २५ ते ३०किलो
    • पैदाशीचे गुणवैशिष्टये :

    कोकण कन्याल


    • स्थान :कन्याल जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील(मुंबई विभाग) समुद्ग किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, लिल्हा म्हणून ह्या प्रसिध्द आहे. आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये ह्या शेळ्या वाढतात हे त्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. कोकण कन्याल शेळी हे कोकणाचे भुषण आहे. कोकण कन्याल शेळीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाण

    • शारिरीक गुणधर्म :

    • रंगः- वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात.
    • पायः- लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात.
    • कातडीः- कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा-या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो. शरीरावर छोटे केस आढळतात.
    • डोक :- नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात.
    • कपाळः- काळ्या रंगाचे, चपटे आणि रुंद असते.
    • कान्‌:- काळा रंग आणि पांढ-या रंगाच्या कडा, चपटे लांब आणि लोंबणारे असतात.
    • शिंगेः- टोकदार, सरळ आणि मागे वळलेली आढळतात.
    • नाकः- स्वच्छ आणि रुंद आढळतात.

    वजने :

    जन्मतः वजन १.७६ ते २.१९ सरासरी १.१९ कि.
    लिंग शारीरीक वजन (कि) उंची (सेमी) छातीचा घेर (सेमी) लांबी (सेमी)
    बोकड ५२.५७ ८३.०० ९०.०० ८४.००
    शेळी ३२.८३ ६८.६ ७४.०० ७१.००

    पैदाशीचे गुणवैशिष्टये :

    ह्या शेळ्या नियमित आणि वर्षभर माजावर येतात. जुळ्याचे प्रमाण ६६% आढळते उन्हाळ्यामध्ये विणा-या शेळ्यामध्ये जुळ्याचे प्रमाण जास्त आढळते.
    स्त्रोत : https://ahd.maharashtra.gov.in





    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Translate »