सगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.

0

 सगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.

दिघवद वार्ताहर –  चांदवड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने काही ठिकाणी ढगफुटी सारखे पाऊस झाले त्यावेळेस शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले असून आज आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी तालुक्याच्या दक्षिण भागाची पाहणी केली असता सरसकट पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी दिघवद येथे सोयाबीन , मका, कांदा रोपे आदी पिके पाण्यात असल्याने कृषी अधिकारी व सर्व अधिकाऱ्यांना पंचनामे करा असे सांगितले काही भागात रस्ता पाण्याने वाहून गेल्याने दळणवळण बंद झाल्याचेही पाहणी केली तर दिघवद हिरापूर रोड वर पाणी असल्याने आमदारांची गाडी न गेल्याने पिकपाहणी करण्यासाठी दिघवद येथील आप्पा मापारी यांच्या मोटरसायकल वर आमदार आहेर यांनी पाहणी केली तसेच दिघवद येथे पिकाच्या नुकसानाची पाहणी केली  दहिवद  ते बोपाणे रस्त्याच्या संदर्भात अधिकार्यांना रस्त्याचे कामाचे सूचना केल्या . ओझरखेड कालव्याचा ओव्हर टॅपिंग चा प्रॉब्लेम दरवर्षीप्रमाणे यावर्षी आल्याने शेतीचे नुकसान झाल्याने या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याचे नमूद केले तसेच वाहेगाव काळखोडे रोडवरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले नारायणखेड शिव रस्त्याचे कामाचे आश्वासन आमदारांनी दिले. त्यानंतर तळेगाव येथील शेतीचे पिकाचे नुकसानीची पाहणी केली , व कातरणी, वडगाव पंगू आदी गावाची पाहणी केली यावेळी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच मनोज शिंदे, पिंटू भोईटे ,अमर मापारी, सरपंच उत्तम झाल्टे ,गणेश निंबाळकर ,दिलीप मापारी, राजाराम मापारी, विलास गांगुर्डे, गंगाधर गांगुर्डे, आप्पा मापारी, आनंद गांगुर्डे, उत्तम मापारी, किरण मापारी,   आदी शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »