दिघवद शाळेला आजी माजी सैनिकांनी जलशुद्धीकरण मशिन भेट‌‌.

0

दिघवद शाळेला आजी माजी सैनिकांनी जलशुद्धीकरण मशिन भेट          ‌‌.                      ‌ 

दिघवदः  कैलास सोनवणे  चांदवड तालुक्यातील दिघवद येथिल जिल्हा परिषद शाळा व स्वमी विवेकानंद विद्यालयाला   आरो पे, जलशुद्धीकरण मशिन चे उद्घाटन चांदवड तालुक्याचे प्रांत उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले  यावेळी एस बी आय बँक शाखा व्यवस्थापक प्रशांत मोदी प्रकाश शेळके रिजवान घाशी गणेश निंबाळकर  सरपंच उत्तमराव झालटे विद्यालयाचे अध्यक्ष अनिल गांगुर्डे आदी व्यासपीठावर उपस्थित होते                  दिघवद येथिल आजी माजी सैनिकांनी जलशुद्धीकरण मशिन दिल्याने  शाळेच्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी   शंकर रसाळ चंद्रभान गांगुर्डे किशोर मापारी बाळासाहेब गाडे   समाधान मापारी विकास गांगुर्डे बबनराव पगार रामदास गांगुर्डे कारभारी मापारी योगेश गांगुर्डे नवनाथ बारगळ  यांनी दिघवद येथिल पन्नास ते पंचावन्न आजी माजी सैनिकांसी संधान  साधून जलशुद्धीकरण प्रकल्प साठी सहकार्य केलयाचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी यावेळी सांगितले  यावेळी आजी माजी सैनिकांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक अध्यक्ष व  शिक्षकांनी केला  यावेळी  विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन आनंदराव गांगुर्डे  छत्रपती शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष अनिल गांगुर्डे  कारभारी गांगुर्डे सुनील गांगुर्डे चांगदेव  थोरात तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव गाडे व सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  के पी गांगुर्डे यांनी केले तर आभार     विद्यालयाचे    उप प्राचार्य एस एम देवरे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »